हर्णै-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

हर्णै-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

rat०८२१.txt

बातमी क्र. २१ (टुडे पान १ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat८p२०.jpg ः
८१३२७
माधव गवाणकर
--
माधव गवाणकरांचा गौरव

हर्णै ः दापोली येथील स्तंभलेखक माधव गवाणकर यांचा त्यांच्या कुडाळदेशकर गौड ब्राह्मण समाजातर्फे नुकताच गौरव करण्यात आला. शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि १ हजार रुपयांचा धनादेश या गौरवाचे स्वरूप आहे तसेच मुंबईच्या या गौड ब्राह्मण सभेतर्फे गवाणकर यांना दरवर्षी आर्थिक साहाय्य म्हणून विशिष्ट वेगळी रक्कमही दिली जात आहे. ते एकल जीवन जगत असून, दापोलीतून दीर्घकाळ लेखनकार्य करत आहेत. त्यांच्या उतारवयात मुंबईने त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.
--

शेअर ट्रेडिंग करिअरविषयी मार्गदर्शन

रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल आणि टी. डब्लू. जे. या शेअर ट्रेडिंग, इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीतर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात कार्यक्रम झाला. शेअर मार्केट व ट्रेडिंग तसेच इव्हेंट मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, एंटरटेनमेंट व मीडिया, ट्रॅव्हलिंग, आयटी अशा विविध क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या सेमिनारमध्ये १५० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रूपेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्लेसमेंट सेलच्या कार्याचा आढावा घेतला. उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. महेश्वरी पाटणे यांनी उपक्रमाबद्दलचे आपले विचार मांडले. कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, टी. डब्लू. जे. चे संचालक अमित बालम, प्रतिनिधी सुशांत विचारे, यश वळंजू, सिद्धेश पाटील, प्रणव बोंडे, ओंकार घाडगे, कीर्ती जोशी, अमित जाधव, रोहित खंडागळे, आदर्श कोकणकर, सत्यशील युवराज उपस्थित होते.
--

दापोलीत १९ ला शिवजन्मोत्सव सोहळा

हर्णै ः दापोली बाजारपेठेतील लोकमान्य टिळक चौकातील श्री मानाचा गणपतीतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा १९ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त शिवज्योत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार असून त्यामध्ये लाठी काठी प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. तसेच प्रतिमेचे पूजन व महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित नाटक ''वाघनखं'' सादर होणार आहे. सर्व कार्यक्रमांना दापोलीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com