शिवजयंतीनिमित्त इन्सुलीत विविध कार्यक्रम

शिवजयंतीनिमित्त इन्सुलीत विविध कार्यक्रम

81396
इन्सुली ः येथील सांस्कृतिक सभागृहात मार्गदर्शन करताना उत्सव समिती प्रमुख नारायण राणे.

शिवजयंतीनिमित्त इन्सुलीत विविध कार्यक्रम

सभेत नियोजन; विविध स्पर्धा, भजनी डबलबारी, शोभायात्रेचा समावेश

बांदा, ता. ८ ः शिवजयंती सोहळ्यानिमित्त येथील शिवजयंती उत्सव मंडळ, मराठा समाज इन्सुली व ग्रामस्थांच्या वतीने इन्सुली येथे १९ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने उत्सव समितीचे प्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा, शिवचरित्रावर आधारित नाट्यपुष्प व डबलबारीचा जंगी सामना असे विविध कार्यक्रम होणार आहेत. विशेष म्हणजे शिवजयंतीनिमित्त गावातील प्रत्येक घरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची छबी असलेला भगवा झेंडा उभारण्यात येणार असून त्यासाठी उत्सव समितीतर्फे प्रत्येक घरात आदल्या दिवशीपर्यंत झेंड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच यासाठी गावस्तरावर वेगळी समिती स्थापन केली आहे.
समिती प्रमुख राणे यांच्या अध्यक्षतेखाली काल (ता. ७) सायंकाळी सांस्कृतिक सभागृह, कोनवाडा येथे बैठक पार पडली. या वेळी मराठा समाज अध्यक्ष नितीन राऊळ, तंटामुक्त समिती अध्यक्ष रघुनाथ देऊलकर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष उमेश पेडणेकर, खजिनदार किरण गावडे, संचालक मनोहर गावकर, माजी सरपंच नाना पेडणेकर, मयूर चराटकर, सामाजिक कार्यकर्ते आपा आमडोसकर, आनाजी देसाई, सुरेंद्र कोठावळे, न्हानू कानसे, वैभव राणे, स्वामी पेडणेकर, सुनील सावंत, दाजी हांडेकर, संकेत राऊळ आदी उपस्थित होते.

चर्चेदरम्यान कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली. यात बबन राणे यांच्या संयोजनातून प्रत्येक घरासमोर शिवजयंतीनिमित्ताने गुढी उभारावी, असे ठरविण्यात आले. त्यासाठी संपूर्ण गावातील घरांसाठी लागणारे शिवरायांची छबी असलेले झेंडे ते स्वतः पुरविणार असून त्यासाठी समितीसुद्धा निवडण्यात आली. इन्सुली-गावठाण येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या उत्सवाशिवाय अन्य कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले. यात इन्सुली गावातील सर्व दहा शाळा व हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सकाळी नऊला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्यात प्रत्येक शाळेला शिवचरित्रावर आधारीत कार्यक्रम करावयाचा आहे. त्यातून अनुक्रमे तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. त्याच दरम्यान गावातील शिवप्रेमींची संत सोहिरोबानाथ मंदिर येथून शोभायात्रा निघणार आहे. यात ढोलपथक व पालखी हे आकर्षण असणार आहे. ही शोभायात्रा डोबाशेळ येथून कोनवाडा, सावंतटेंब, कुडवटेंब, खामदेवनाका येथून धुरीवाडी मार्गे गावठण येथे कार्यक्रम स्थळी येणार आहे. कार्यक्रमादरम्यान अल्पोपहाराची सोय उत्सव समितीतर्फे करण्यात येणार आहे. स्पर्धेनंतर लागलीच बक्षीस वितरण होणार असून त्यानंतर सकाळच्या सत्रातील कार्यक्रम संपणार आहेत.
------
इतर कार्यक्रम असे
रात्री ८ वाजता बबन राणे दिग्दर्शित स्थानिक तेरा कलाकारांचे ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ ही नाट्यप्रवेशिका होणार आहे. साडेआठला निनादेवी प्रासादिक भजन मंडळ, उंडिलचे (ता. देवगड) गुरुवर्य बुवा प्रकाश पारकर, बुवा व्यंकटेश नर (पखवाज-सागर कदम, तबला-भावेश लाड) विरुद्ध सद्गुरु संगीत भजन मंडळ, कुडाळचे गुरुवर्य बुवा विशाल राणे, बुवा वैभव सावंत (पखवाज-निखिल पावसकर, तबला-रोशन सावंत) यांचा आमनेसामने डबलबारीचा जंगी सामना होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com