चिपळूण पालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक मंजूर करणार

चिपळूण पालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक मंजूर करणार

rat०८२४.txt

(पान २ साठी)

चिपळूण पालिकेचा दीडशे कोटीचा अर्थसंकल्प

प्रशासक मांडणार ; जिल्हाधिकारी देणार अंतिम मंजुरी

चिपळूण, ता. ८ ः चिपळूण पालिकेत प्रशासकाची नेमणूक असल्यामुळे यावर्षी सुमारे दीडशे कोटीचा अर्थसंकल्प प्रशासन मांडणार आणि प्रशासक मंजूर करणार आहे.
येथील पालिकेची मुदत संपली आहे. मुदत संपवून जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. अजुनही निवडणुका न झाल्याने पालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. आणखी काही महिने पालिका निवडणूक होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यावर्षी पालिकेचे अंदाजपत्रक प्रशासक मंजूर करणार आहेत. दरवर्षी अंदाजपत्रक तयार करताना नगरसेवकांशी चर्चा केली जात होती. लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून काही बदल केले जात होते. यावर्षी लोकप्रतिनिधी नसल्याने अंदाजपत्रकाला प्रशासक मंजुरी देणार आहेत. फेब्रुवारीपर्यंत पालिकांचे अंदाजपत्रक मंजूर केले जाते. यासाठी गेल्या आठ महिन्यांतील खर्च व पुढील चार महिन्यात होणाऱ्या अपेक्षित खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात केली जाते. प्रशासन अंदाजपत्रक तयार करून प्रशासकांना सादर करणार आहे. अर्थसंकल्प मान्यतेसाठी स्थायी व सर्वसाधारण सभेत ठेवणार आहे. पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात असल्याने प्रशासक बैठक घेऊन अर्थसंकल्पाला मंजुरी देणार आहेत. अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले जाणार आहे. पुढील काही दिवसात निवडणुका झाल्या तरी पदाधिकाऱ्यांची निवड होईपर्यंत मार्च महिना संपेल. त्यामुळे यावर्षीचे अंदाजपत्रक प्रशासक मंजूर करणार हे स्पष्ट झाले आहे.
--
कोट
पालिकेच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नसणार आहे. मुळात करवाढीचा विषय शासनाशी निगडित असतो. पालिकास्तरावर कोणतीही करवाढ नसणार आहे. चार दिवसात अर्थसंकल्प तयार होईल. सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असेल.
- अनंत मोरे, प्रशासकीय अधिकारी
--
कोट
घनकचरा प्रकल्पाचे आधुनिकीकरण हे या वर्षीच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य असेल. अत्याधुनिक बायोमेट्रिक कचरा प्रकल्पातून खतनिर्मितीला सुरवात झाली आहे. प्राथमिक स्वरूपात ही खतनिर्मिती असून तांत्रिक आणि प्रायोगिक चाचण्या व तपासणी पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने खत निर्मिती सुरू केली जाणार आहे. तसेच बायोगॅस व वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच हे महत्वाकांक्षी प्रकल्पदेखील पूर्ण होणार आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास कोकण आणि महाराष्ट्रातील पालिका, नगर पंचायतींचे प्रतिनिधी हा प्रकल्प पाहण्यासाठी येतील असा विश्वास आहे.

- प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी तथा प्रशासक चिपळूण पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com