स्मृतिज्योत सदभावना रॅलीने गुरुवर्यांना अभिवादन

स्मृतिज्योत सदभावना रॅलीने गुरुवर्यांना अभिवादन

Published on

Rat8p14.jpg ः
81324
मंडणगड ः शहर परिसरातून काढण्यात आलेली गुरूवर्य सद्भावना स्मृतिज्योत रॅली.
Rat8p16.jpg ः
81326
गुरूवर्य स्मृतिज्योत रॅलीत विविध वेशभूषा साकारण्यात आल्या. (छाया- विधान पवार)
--------------
स्मृतिज्योत सद्भावना रॅलीने गुरूवर्यांना अभिवादन
संभुराजू तुरेवाले मंडळ ; मंडणगड ते धुत्रोली प्रवास; जयघोषाने परिसर दुमदुमला
मंडणगड, ता. ८ ः संभुराजू तुरेवाले सांस्कृतिक उन्नती मंडळ (रजि.) यांच्यावतीने संभुराजू घराण्यातील दिवंगत झालेल्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने कला घराण्याचे नावलौकिक केलेल्या गुरूवर्यांच्या स्मरणार्थ स्मृतिज्योत सद्भावना रॅलीने त्यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी शाहिरांची मांदियाळी जमली.
संभुराजू घराणे तुरेवाले या कला घराण्याचा वारसा चालवताना लोककला जपवणूक करणाऱ्या गुरूवर्य शाहीर यांच्या कार्यस्मृतींना उजाळा मिळावा या उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीमध्ये संभुराजू स्मृतिज्योत (भिलवडी, ता. सांगली), गुरूवर्य (कै.) गंगाराम धाडवे, गुरूवर्य (कै.) गणपत आगबुले, गुरूवर्य (कै.) देवजी कदम, गुरूवर्य (कै.) अनंत बैकर (नडगाव, ता. महाड), ब्रह्मनिष्ठ गुरूवर्य काशीराम कुंभार (नरवण, महाड), गुरूवर्य (कै.) गोविंद लाड, (कै.) नामदेव दळवी (शेनाळे, ता. मंडणगड ), गुरूवर्य (कै.) बाजी मोंडे, (कै.) पांडुरंग अधिकारी, गुरूवर्य विठोबा पोटले, गुरूवर्य लोकशाहीर तुकाराम मानकर (पेण, ता. माणगाव), गुरूवर्य तुकाराम माळी (पाले, ता. मंडणगड), गुरूवर्य सखाराम वाळणकर (सवाद, ता. पोलादपूर), गुरूवर्य किसन महाडिक, गुरूवर्य लक्ष्मण दिवेकर, गुरूवर्य वासुदेव महाडिक (पाट, ता. मंडणगड), गुरूवर्य पांडुरंग सुगदरे, गुरूवर्य शिवराम घाग, (धुत्रोली हनुमानवाडी, ता. मंडणगड) यांच्या स्मृतिज्योत मुळगाव येथून मंडणगडला आणण्यात आल्या. यानंतर मंडणगड बसस्थानकापासून ढोलताशांच्या गजरात लेझिम नृत्य सादर करत ही मिरवणूक धुत्रोलीपर्यंत काढण्यात आली. यामध्ये अनेक नामवंत शाहीर, कलाकार सहभागी झाले. विशेषतः महिलांची संख्या लक्षणीय होती. बसस्थानक परिसरात सादर करण्यात आलेल्या लेझिम नृत्याने रंगत भरली. या स्मृतिज्योत धुत्रोली गावी कार्यक्रमस्थळी स्थानापन्न करण्यात आल्या. यानंतर रात्रभर जाखडी नृत्याचा कलाविष्कार रंगला.

चौकट
देवदेवता, महापुरुषांच्या वेशभूषा ठरल्या रॅलीचे आकर्षण
गुरूवर्य सद्भावना स्मृतिज्योत रॅलीमध्ये नरवण (ता. महाड) येथून आलेल्या मुलांनी देवदेवता महापुरूषांच्या वेशभूषा केल्या होत्या. यामध्ये शंकर, पार्वती, शिवाजी महाराज, जिजाई, कृष्ण राधा, गणपती, तानाजी मालुसरे, खंडेराया यांच्या वेशभूषा होत्या. नागरिकांनी ही रॅली पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. लोककलेच्या तारांगणात आयुष्य घटवणाऱ्या शाहिरांना वाहण्यात आलेली ही आगळीवेगळी आदरांजली सर्वार्थाने विशेष ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.