जाखडी स्पर्धेत तुरेवाडी नाच मंडळ प्रथम

जाखडी स्पर्धेत तुरेवाडी नाच मंडळ प्रथम

rat०८९.txt

बातमी क्र..९ (पान २ साठी)

फोटो ओळी
-Rat८p१९.jpg ः
८१३२०
धुत्रोली ः प्रथम क्रमांक पटकावलेल्या भैरवनाथ प्रासादिक नाच मंडळ तुरेवाडी मंडणगड यांना गौरवताना मान्यवर.
----
जाखडी स्पर्धेत तुरेवाडी नाच मंडळ प्रथम

राज्यस्तरीय स्पर्धा; १२ कलापथकांचा सहभाग

मंडणगड, ता.९ ः संभुराजू तुरेवाले सांस्कृतिक उन्नती मंडळाच्या राज्यस्तरीय जाखडी नृत्य स्पर्धेत भैरवनाथ प्रासादिक नाच मंडळ तुरेवाडी मंडणगड यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर श्रीकाळभैरव नृत्य कलापथक कालसुरी म्हसळा द्वितीय, जय हनुमान नृत्य कलापथक मूर माणगाव तृतीय, भैरवनाथ नृत्य कलापथक तुळशी गणेशवाडी मंडणगड चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेतील लक्षवेधी कलापथक अमर नृत्य कलापथक करंजखोल (ता. महाड), शिस्तबद्ध कलापथक पेणजाई नृत्य कलापथक पेण (ता. माणगाव) यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे व्यवस्थापक म्हणून धुत्रोली हनुमानवाडी ग्रामस्थ, महिला व मुंबई मंडळाने केले.
या स्पर्धेत सव देऊळवाडी, सव उगवतीवाडी, सवाद, भेळेवाडी नवोशी, शेनाळे, उसरघर येथील कलापथकांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून मंडळाचे अध्यक्ष रमेश घडवले, उपाध्यक्ष विद्यानंद अधिकारी, सुधीर महाडिक यांनी काम पाहिले. स्पर्धेचे परीक्षण रामचंद्र म्हात्रे, प्रल्हाद शिरशिवकर, मिलिंद लिंगायत, नितीन लांबे, डॉ. श्रीधर बाम, अजित लाड, रामदास वारीक, शिवराम पोटले यांनी केले. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, ढोलकी, प्रशस्तीपत्र, मेडल, सहभागपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रत्येक कलासंचातील एका नृत्य कलाकाराला लक्षवेधी नृत्य कलाकार म्हणून सन्मानचिन्ह देण्यात आले.
---

कलाकौशल्य उच्च दर्जाचे
स्पर्धेतील व्यक्तिगत पारितोषिकासाठी कलाकारांनी दाखवलेले कलाकौशल्य उच्च दर्जाचे राहिले. सुमधूरता, तालबद्धता, सूरमय आवाज, पाय थिरकायला लावणारे ढोलकी वादन आणि शब्दसंपदा दर्शवणारी काव्यरचना आपला ठसा उमटवणाऱ्या ठरल्या. यामध्ये सर्वोत्कृष्ट गायक उदयकुमार नाकती (कालसुरी), सर्वोत्कृष्ट कवी संतोष भात्रे (मूर), सर्वोत्कृष्ट ढोलकीवादक सिद्धेश धाडवे (तुरेवाडी), सर्वोत्कृष्ट कोरस कल्पेश शिगवण, प्रशांत नाकती (तुरेवाडी) यांना गौरवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com