चिपळूण बॅंकेला यशाच्या शिखरावर नेणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण बॅंकेला यशाच्या शिखरावर नेणार
चिपळूण बॅंकेला यशाच्या शिखरावर नेणार

चिपळूण बॅंकेला यशाच्या शिखरावर नेणार

sakal_logo
By

ratchl84.jpg
81385
चिपळूणः येथील अर्बन बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करताना आमदार शेखर निकम.
--------------
बॅंकेला यशाच्या शिखरावर नेणार
चेअरमन निहार गुडेकर; उपाध्यक्षपदी नीलेश भुरण बिनविरोध

चिपळूण अर्बन बॅंक--लोगो

चिपळूण, ता. ८ः येथील चिपळूण अर्बन बँकेच्या प्रगतीत संचालकांसह सभासदांनीही मोलाचे योगदान दिले. त्यामुळे बँक भरभक्कमपणे उभी आहे. या पुढील कालावधीत सर्व संचालकांच्या साथीने बँकेला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन निहार गुडेकर यांनी निवडी प्रसंगी दिली.
चिपळूण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची बैठक डीबीजे महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झाली. या बैठकीत बँकेच्या चेअरमनपदी तरुण व्यावसायिक निहार गुढेकर तर व्हाईस चेअरमनपदी नीलेश भुरण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चिपळूण अर्बन बॅंकेची सार्वत्रिक निवडणूक महिनाभरापूर्वी बिनविरोध झाली होती. यामध्ये अनुभवी तसेच नवीन चेहऱ्यांना संधी देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार गेली 15 वर्षे संचालक असलेले गुढेकर यांची चेअरमपदी तर भुरण यांची व्हाईस चेअरमन पदावर निवड करण्यात आली.
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. के. बांगर, ज्येष्ठ संचालक संजय रेडीज, मोहन मिरगल, राजेश केळस्कर, मिलिंद कापडी, गौरी रेळेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, बांधकाम व्यावसायिक रमेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम आदीं उपस्थित होते.

कोट
बँकेच्या इतिहासात प्रथमच महिला म्हणून बँकेचे नेतृत्व करण्याची संधी सर्व संचालकांच्या सहकार्यातून मिळाले. अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच कोरोनाची परिस्थिती उद्भवली. त्यानंतर महापुरासारख्या महाभयंकर संकटाला सामोरे जावे लागले. या कालावधीत बँकेच्या काही ध्येयधोरणावर बदल केले गेले. व्याजदर घटल्याने ठेवीवर परिणाम झाला. कोरोना कालवधीतही कर्जाच्या वसुलीचे प्रमाण चांगले होते. विविध अडचणीवर मात करत बँकेचा एनपीए कमी केला. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी बँकेच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहू.
- राधिका पाथरे, माजी अध्यक्षा, चिपळूण अर्बन बॅंक