संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

rat०८२७.txt

(पान ५ साठी, संक्षिप्त)

शिमगोत्सवासाठी ६ जादा बसेस धावणार

खेड ः येथील बसस्थानकातून शिमगोत्सवासाठी ६ जादा बसेस चालवण्याचे नियोजन येथील एसटी प्रशासनाने केले आहे. ७ ते १२ मार्च या कालावधीत या बसेस धावणार आहेत. यामध्ये सकाळी ९.३० वा. खेड–बोरिवली, १०.१५ वा. शिवतर-खेड-बोरिवली, १०.३० वा. खेड-भांडुप, दुपारी २ वा. पन्हाळजे-मुंब्रा-ठाणे या बसफेऱ्यांचा समावेश आहे. या चार बसफेऱ्या ७ मार्चपासून धावणार आहेत. यामध्ये सकाळी ८.३० वा. खेड-तुळशी-विरार, सकाळी ११ वा. खेड-तुळशी-विठ्ठलवाडी या बसफेऱ्या १ मार्चपासून धावणार आहेत. तरी या मार्गावरील प्रवाशांनी या बसफेऱ्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
---

मधुसुदन सुर्वेना वीर्स ऑफ इंडिया पुरस्कार

खेड ः शिवतरचे सेवानिवृत्त सैनिक पॅराकमांडो मधुसुदन सुर्वे यांना अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते वीर्स ऑफ इंडिया पुरस्कार देण्यात आला. प्रभादेवी रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी कीर्तीचक्र पुरस्कारप्राप्त निवृत्त नायब सुभेदार संतोष राळे, ज्येष्ठ निवृत्त नौदल कमांडर दीपक जांबेकर, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक मंगेश नाईक, निवृत्त कॅप्टन योगेंद्रसिंग यादव उपस्थित होते.
---

चाटवच्या समता कलापथकाचा गौरव

खेड ः संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील विश्व समता कलामंच व डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच, रत्नागिरी व चंद्रकांत उर्फ बावा शेट स्मृतीगंध प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील चाटव अस्तान येथील समता कलापथकाचा विशेष गौरव करण्यात आला. समता कलापथकाने प्रथमच सहभाग दर्शवून उपस्थितांची मने जिंकल्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.