सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा

सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा

81351
मालवण ः स्नेहमेळ्यानिमित्त सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी एकत्र आले.

सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा
तळेरे, ता. ८ : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी १८ वर्षांनी एकत्र आले आणि महाविद्यालयीन आठवणींना उजाळा मिळाला. आज एकत्र जमुया, उद्या एकत्र होऊया असे करता करता १८ वर्षे निघून गेली आणि अखेर १९ व्या वर्षी विविध ठिकाणचे मित्रमैत्रिणी एकत्र आले.
मालवण येथील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या बारावीचे २००४ चे विद्यार्थी एकत्र आले. यानिमित्ताने एका नव्या उत्साहाची आणि कामाची सुरुवात झाली. या माजी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या शाळेला भेट दिली. प्रदीर्घ कालावधीनंतर संपूर्ण शाळा पाहिली आणि महाविद्यालयीन आठवणी जाग्या झाल्या. त्यानंतर पुढचे नियोजन ठरले. गेली अनेक वर्षे एकत्र यायचे ठरत होते; मात्र सर्वांनाच शक्य होत नव्हते. अखेर ती वेळ यावर्षी जुळून आली. या या स्नेहमेळाव्यात सर्वांनी सर्वप्रथम आपली ओळख नव्याने करून दिली. त्यानंतर कॉलेजच्या जुन्या आठवणी, वर्गात, सांस्कृतिक कार्यक्रमांत, सहलीच्या वेळी केलेली धमाल किस्से काही क्षणांत विविध अनुभवातून उमजून आले. पुन्हा एकदा सर्वजण जुन्या नव्या आठवणींमध्ये रमले. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन करून प्रत्येकवर्षी आपल्या शाळेला भेट देऊन माजी विद्यार्थी या नात्याने काहीतरी योगदान देण्याचे ठरविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com