देवगड तालुक्याची स्पर्धांमध्ये बाजी

देवगड तालुक्याची स्पर्धांमध्ये बाजी

Published on

क्रीडा स्पर्धा चित्र

देवगड तालुक्याची स्पर्धांमध्ये बाजी

जिल्हा परिषद क्रीडा महोत्सव; क्रिकेटमध्ये पाचव्यांदा विजेते

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ८ ः जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात तालुक्याने आपले नाव कोरले. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या क्रिकेट स्पर्धेत येथील पंचायत समितीने बाजी मारली. सलग पाच वर्षे क्रिकेटमध्ये विजेतेपद पटकावले.
या महोत्सवात पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीने सर्वच क्रीडा विभागांत लक्षवेधी कामगिरी केली. यामध्ये सांघिक पुरुष गट क्रिकेटच्या अंतिम सामन्यात कर्णधार दीपक मयेकर यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग संघाचा पराभव करून सलग पाचवे रोमहर्षक विजेतेपद पटकावले. तर कबड्डीमध्ये कर्णधार आनंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी संघावर मात करत विजेतेपद पटकावले. खो-खो स्पर्धेमध्ये तालुका उपविजेता ठरला. व्हॉलीबॉल स्पर्धेतही उपविजेतेपद पटकावले. तर वैयक्तिक पुरुष गटात १०० व २०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक सुनील कोदले, थाळी फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक ग्रामसेवक आदित्य कदम, तर महिलांमध्ये भाला फेकमध्ये द्वितीय क्रमांक शीतल मयेकर, गोळा फेक (दिव्यांग) प्रकारात प्रथम क्रमांक अश्विनी सावंत, बुद्धिबळ (दिव्यांग) प्रथम क्रमांक कुंदा बोंडाळे, कॅरम (दिव्यांग) प्रथम क्रमांक अश्विनी सावंत, द्वितीय क्रमांक कुंदा बोंडाळे, तर ४०० मिटर धावणेमध्ये भारती आसरोंडकर तृतीय क्रमांक यांनी पटकावला. सांस्कृतिक कार्यक्रमांतही कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांची लावणी लक्षवेधी ठरली. तसेच पंचायत समितीच्या गोंधळाला सर्वांची पसंती मिळाली. शिक्षण विभागाचेही नृत्य चांगले झाले. शिक्षक सचिन जाधव यांचे संगीत संयोजन लक्षवेधी ठरले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी त्यांचे अभिनंदन केले. या संपूर्ण स्पर्धेत प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधीक्षक कुणाल मांजरेकर, अधीक्षक मेधा राणे, विस्तार अधिकारी अंकुश जंगले, विस्तार अधिकारी नीलेश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.