जनसामान्यांच्या हितार्थ काम करा

जनसामान्यांच्या हितार्थ काम करा

81387
देवगड ः येथील बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सदाशिव ओगले, उपाध्यक्ष अभय बापट यांचा आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत सत्कार झाला. (छायाचित्र ः वैभव केळकर)

जनसामान्यांच्या हितार्थ काम करा

आमदार नीतेश राणे ः ‘देवगड अर्बन’च्या नूतन अध्यक्ष, संचालकांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ८ : सहकारामध्ये बँकेचा विकास नजरेसमोर ठेवून जनसामान्यांच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी नवनिर्वाचित संचालकांना येथे केले. येथील दी देवगड अर्बन को-ऑप. बँकेच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालकांचा सत्कार करताना आमदार राणे बोलत होते.
यावेळी मंचावर माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, जिल्हा बँक संचालक अ‍ॅड. प्रकाश बोडस, बँकेचे मावळते अध्यक्ष दिलीप तथा भाई आचरेकर, मुकुंद फाटक, नवनिर्वाचित अध्यक्ष सदाशिव ओगले, नवनिर्वाचित उपाध्यक्ष अभय बापट, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चौगले आदी उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व संचालकांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आमदार राणे यांच्यासह माजी आमदार अ‍ॅड. गोगटे, नंदकुमार घाटे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी घाटे यांनी, सहकारामध्ये निःस्वार्थीपणे काम करायला हवे. सहकारामध्ये राजकारण असू नये. सहकार वाढीसाठी राजकीय विचार बाजूला ठेवायला हवेत, असे सांगितले. तर मुकुंद फाटक यांनी, सहकारातील कामाला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. बँकेचा उत्कर्ष करण्याची भावना नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालकांनी कायम मनात ठेवली पाहिजे, असे सांगितले. यावेळी अ‍ॅड. अजित गोगटे, भाई आचरेकर, अभय बापट आदींनी मनोगत व्यक्त केले. मनोज सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी भाजपचे राजू राऊळ, माजी उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, राजेश घाटे आदी उपस्थित होते.
...............
चौकट
राजकीय चष्मा दूर ठेवणार
बँकेत काम करताना सर्वसामान्यांची गरज ओळखून पतपुरवठा केला जाईल. कर्ज वसुलीकडे प्राधान्याने लक्ष देऊन बँकेची प्रगती साधली जाईल. काम करताना राजकीय चष्मा असणार नाही, असे नवनिर्वाचित अध्यक्ष ओगले यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com