गुहागर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी डॉ. अनिल जोशी

गुहागर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी डॉ. अनिल जोशी

rat८p३२.jpg
L८१३७४
गुहागरः तालुका खरेदी-विक्री संघाचे नूतन चेअरमन डॉ. अनिल जोशी आणि व्हा. चेअरमन रवींद्र अवेरे यांचे नूतन संचालकांसह अभिनंदन करताना भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक.
-------------
गुहागर खरेदी-विक्री संघ
अध्यक्षपदी डॉ. अनिल जोशी
गुहागर, ता. ८ः तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय सहकार पॅनलने महाविकास आघाडी पॅनेलवर १२ विरुद्ध ३ ने विजय मिळवला होता. आज निवडणूक निर्णय अधिकारी कुमार देवरूखकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका खरेदी-विक्री संघ कार्यालयात पार पडलेल्या पदाधिकारी निवडीमध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अनिल जोशी (नरवण) यांची चेअरमनपदी तर व्हा. चेअरमनपदी आंबेरेखुर्दचे सरपंच रवींद्र अवेरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी सुरेश सावंत, श्रीकांत महाजन, लक्ष्मण शिगवण, सुभाष कोळवणकर, सुरेश चौगुले, सिराज घारे, शाम गडदे, गणेश तांबे, रश्मी घाणेकर, अश्विनी जोशी, सचिन बाईत, पांडुरंग कापले, पंकज बिर्जे आदी सर्व नूतन संचालक या वेळी उपस्थित होते. गुहागर तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमित खतपुरवठा व त्यांच्या शेतमालाला योग्य न्याय मिळवून देऊन गुहागरमधील शेतकरी आर्थिक संपन्न होण्यासाठीचे प्रयत्न सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन करणार आहे, असे डॉ. जोशी यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यावर सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com