उद्यमनगरमधील अपार्टमेंटमध्ये चोरी

उद्यमनगरमधील अपार्टमेंटमध्ये चोरी

उद्यमनगरमधील अपार्टमेंटमध्ये चोरी
रत्नागिरीः शहराजवळील उद्यमनगर पटवर्धनवाडी येथील गौरव अपार्टमेंटमध्ये मोबाईल व रोख रक्कमेची चोरी झाली. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. ६) सकाळी साडेसहा ते दहा या वेळेत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य पांडुरंग गुळेकर (वय २१, रा. गौरव अपार्टमेंट, उद्यमनगर, रत्नागिरी) यांच्या घरातील मोबाईल व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने पळवून नेली. या प्रकरणी गुळेकर यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
------
पादचारी महिलेला रिक्षाची ठोकर
रत्नागिरीः खेडशी येथून रत्नागिरी ते हातखंबा रस्त्याच्या साईटपट्टीवरून जाणाऱ्या पादचारी महिलेला रिक्षाची धडक बसल्याने तिच्या डोक्याला मार लागला. अपघातानंतर न थांबता पळून जाणाऱ्या अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा विजय कुवेस्कर (वय ४५, रा. नवीन वसाहत, खेडशी, रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ७) सकाळी साडेनऊच्या सुमारास हातखंबा ते रत्नागिरी रस्त्यावर खेडशी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा कुवेस्कर या रस्त्याच्या साईटपट्टीवरून जात असताना रत्नागिरीहून येणाऱ्या रिक्षाचालकाने पाठीमागून ठोकर दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागून जखमी झाल्या तर रिक्षाचालक अपघात घडला असतानाही पळून गेला. या प्रकरणी तन्वी विजय कुवेस्कर यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com