सत्तर वर्षाच्या आजीसह तरुणाची देहदानाची इच्छा

सत्तर वर्षाच्या आजीसह तरुणाची देहदानाची इच्छा

Published on

सत्तर वर्षाच्या आजीसह
तरुणाची देहदानाची इच्छा
महाआरोग्य शिबिराचे यश; शिबिर घेणार सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी
रत्नागिरी, ता. ८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. ९) मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये एका ७० वर्षीय आजींनी आणि एका २७ वय तरुणाने देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या शिबिराचे हेच यश असून महाआरोग्य शिबिर सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे असल्याच पुन्हा अधोरेखित झाले आहे.
शहरासह ग्रामीण भागातील अनेक नागरिक छोट्यामोठ्या आजारांचा सामना करीत आहेत. एखादी रक्ताची चाचणी करायची म्हटली तरी पाचशे रुपये पुरत नाहीत. त्यामुळे रक्ताच्या विविध चाचण्यांपासून अनेक प्रकारच्या आजारांच्या तपासण्या व त्यावर आधारीत चाचण्याही मोफत होणार आहेत. सर्वसामान्यांच्या खांद्यावर आजारपणामुळे पडणारा आर्थिक भार थोडासा हलका करण्याच्यादृष्टीने महाआरोग्य शिबिर महत्वाचे ठरणार आहे. नागरिकांनी याचे लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन उदय सामंत वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईतील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये उद्या वैद्यकीय शिबिर मारुती मंदिर नाचणे रोड येथील दामले विद्यालयात पार पडणार आहे. नेत्रदान व देहदान सारख्या सामाजिक उपक्रमाचे आवाहनही करण्यात आले आहे. या उपक्रमांनाही प्रतिसाद मिळत आहे. एका ७० वर्षीय आजींनी आणि एका २७ वय असणाऱ्या मुलीने देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली हेच या उपक्रमाचे यश आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत विविध आजारांवर उपचार करणारी आरोग्य शिबिर उदय सामंत वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षातर्फे सुरू आहेत. यात मोफत शस्त्रक्रियाही केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.