पालकमंत्र्यांनी गुहागर मतदार संघाला दिला पाच कोटीचा निधी

पालकमंत्र्यांनी गुहागर मतदार संघाला दिला पाच कोटीचा निधी

rat०८३७.txt
(पान ५ साठी)

गुहागर मतदारसंघाला पाच कोटी

तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर ; संघटना बळकटीसाठी प्रयत्न

गुहागर, ता. ८ ः राज्याच्या नगरोत्थान योजनेतून गुहागर नगरपंचायतीला पालकमंत्री उदय सामंत यांनी १ कोटीचा निधी दिला आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ५ कोटी निधी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर केला. आणखी ५ कोटीचा निधी गुहागर तालुक्याला देणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर यांनी दिली.

तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना स्थापन झाल्यानंतर शृंगारतळी येथे पक्षाची पहिलीच पत्रकार परिषद झाली. या वेळी ज्येष्ठ शिवसैनिक प्रल्हाद विचारे, अमरदीप परचुरे, संतोष आग्रे, सुशील अवेरे, नारायण गुरव आदी उपस्थित होते. या परिषदेत पक्षाच्या आगामी वाटचालीची माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारीला वाढदिवस असून, त्यानिमित्त गुहागर रंगमंदिर येथे करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
गुहागर विधानसभा मतदार संघातून आगामी उमेदवारीसाठी सहदेव बेटकर यांचे नाव जाहीर झाले. याबाबत पत्रकारांनी विचारले असता कनगुटकर म्हणाले, बेटकर हे सध्या पक्षाचे नेते रामदासभाई कदम यांच्या खेड दौऱ्यात आहेत. गुहागर तालुक्यात त्यांचा दौरा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. तालुक्यात संघटना बळकट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असे कनगुटकर यांनी सांगितले.
-
आमदार जाधवांचे विकासाकडे दुर्लक्ष

आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील लोकांना कामे दिली गेली. तालुक्यातील अनेक रस्ते झालेले नाहीत. लोकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. आमदार जाधव यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांना जवळ करून इतरांकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही बाळासाहेबांच्या सेनेत प्रवेश केल्याचे तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com