रत्नागिरी ः अवैध मच्छीमारीला चाप लावण्यासाठी ड्रोनचा वापर

रत्नागिरी ः अवैध मच्छीमारीला चाप लावण्यासाठी ड्रोनचा वापर

Published on

पान १ साठी


अवैध मच्छीमारीला
चाप लावण्यासाठी ड्रोन
मत्स्यविभागाचा निर्णय; सागरी १२ मैल अंतरापर्यंत नजर
रत्नागिरी, ता. ८ ः राज्यामध्ये सागरात होणाऱ्या अवैध मच्छीमारीला चाप लावण्यासाठी राज्याच्या मत्स्य विभागाने हवाई टेहेळणीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ड्रोनच्या साह्याने किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. राज्याला ७२० किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून, समुद्रातील मच्छीमार बोटींवर नियंत्रण, निरीक्षण व टेहेळणीसाठी याचा वापर केला जाणार आहे.
ड्रोनद्वारे अवैध मच्छीमारी करणाऱ्या नौका शोधून त्यांचा माग काढण्यात येणार आहे, तसेच संशयास्पद बोटींवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाईल. त्याबाबतची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली जाईल. मच्छीमारी जेटीवरून निघालेल्या बोटींचा माग काढण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी मच्छीमार जेटीपासून बोटीचे अंतर व मार्ग यांचे विश्लेषण करण्याचे कामही ड्रोन करणार आहे. वैध व अवैध मच्छीमारीवर लक्ष ठेवणे, नियंत्रण करण्यासाठी ही यंत्रणा राबवली जाणार आहे. त्यामुळे अवैध मच्छीमारीला चाप बसणार आहे. ड्रोनच्या टेहेळणीतून मिळालेली माहिती तटरक्षक दल, तटरक्षक पोलिस, अन्य सरकारी यंत्रणांना पुरवली जाईल. त्याचा उपयोग राष्ट्रीय सुरक्षा हितासाठी होऊ शकेल, तसेच या यंत्रणेद्वारे मिळणाऱ्या माहितीतून मच्छीमारीचा पॅटर्न कळू शकेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती विश्लेषण केल्याने ड्रोनच्या साहाय्याने किनारपट्टीपासून १२ सागरी मैल अंतरापर्यंत लक्ष ठेवता येऊ शकेल.

सात जिल्ह्यांत मच्छीमारी
राज्यात पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गला समुद्रकिनारा लाभला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये राज्यात २१ हजार ४२३ मच्छीमारी नौका होत्या. त्यातील १७ हजार ४६० नौका यांत्रिक, तर ३ हजार ९६९ जहाज या बिनयांत्रिक आहेत, तर १५ टक्के नौकांवर ट्रॅकिंग यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे किनारपट्टी सुरक्षा एजन्सींना त्यांच्यावर लक्ष ठेवता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.