खे़ड ः जगबुडीतून काढणार 4 लाख घनमीटर गाळ

खे़ड ः जगबुडीतून काढणार 4 लाख घनमीटर गाळ

पान १ साठी

-rat८p३४.jpg

खेड ः खेड शहरालगत वाहणारी जगबुडी नदी गाळाने भरली आहे. (सिद्धेश परशेट्ये ः सकाळ छायाचित्रसेवा)


जगबुडीतून काढणार ४ लाख घनमीटर गाळ
५० लाखांचा निधी मंजूर; पूरस्थितीपासून खेडवासीयांना मिळणार दिलासा
खेड, ता. ८ ः तालुक्यातील जगबुडी नदीमधील ४ लाख घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे. या कामाला लवकरच गती येणार असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा बंगल्यावर नुकतीच बैठक घेण्यात आली. यामध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
तालुक्यातील जगबुडी नदीमधील (भरणे बांधाऱ्यापासून) ते नारंगी नदी जगबुडी नदीला ज्या ठिकाणी मिळते तिथपर्यंतच्या पहिल्या टप्प्यासाठी त्वरित ५० लाख रुपये निधी मंजूर केला असून, ४ लाख घनमीटर गाळ काढला जाणार असल्याने नदी गाळमुक्त होणार आहे. जगबुडी नदीला २६ जुलै २००५ व जुलै-२०२१ मध्ये महापूर आला होता. तसेच दरवर्षी पुरामुळे खेड शहरात तसेच मुख्यतः बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरते व नागरिकांना, तसेच व्यापाऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. ही हानी पुन्हा होऊ नये, याकरिता उपाययोजना म्हणून या नदीतील गाळ काढण्याची मागणी आमदार योगेश कदम यांनी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा बंगल्यावर नुकतीच बैठक घेण्यात आली. यामध्ये या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या वेळी पालकमंत्री उदय सामंत, अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी आणि नाम फाउंडेशनचे मल्हार पाटेकर उपस्थित होते. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ज्या पुरवणी मागण्या आहेत त्यामध्ये ३.५ कोटींची मागणी खेड शहरातील नदीपात्राचा गाळ काढण्याच्या कामासाठी केलेली असून लवकरच ही मागणीदेखील मान्य होऊन जूनअखेरीला गाळ काढण्याचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे नागरिकांची पावसाळ्यात पूरस्थितीमुळे जी गैरसोय होते त्यापासून त्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com