रस्ता कामगारांच्या वेतनासाठी ठिय्या

रस्ता कामगारांच्या वेतनासाठी ठिय्या

Published on

81419
सिंधुदुर्गनगरी ः येथे बांधकाम कार्यकारी अभियंता अनिल आवटी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन बसलेले भारतीय मजदूर संघ कोकण विभाग संघटन मंत्री हरी चव्हाण.

रस्ता कामगारांच्या वेतनासाठी ठिय्या

हरी चव्हाण यांचे आंदोलन; देवगड उपअभियंतांच्या कारभाराबाबत नाराजी

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः देवगड तालुक्यातील रस्ता कामगारांचे दोन महिने वेतन झाले नाही. ते तात्काळ मिळावे. यासाठी आज भारतीय मजदूर संघ कोकण विभाग संघटन मंत्री हरी चव्हाण यांनी बांधकाम कार्यकारी अभियंता अनिल आवटी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन छेडले.
देवगड तालुक्यातील बांधकाम रस्ता कामगारांना डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ या महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. याबाबत चव्हाण यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे पंधरा दिवसांपूर्वी लक्ष वेधले होते. गेले पंधरा दिवस पाठपुरावा करूनही अद्याप वेतन न मिळाल्याने संबंधित रस्ता कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. देवगड तालुका उप अभियंता यांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीमुळे व त्यांना रस्ता कामगारांविषयी आस्था नसल्याने वेतन रखडले आहे, असा आरोप करत चव्हाण यांनी आवटी यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन छेडले. जोपर्यंत कामगारांना वेतन होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर श्री. आवटी हे आपल्या दालनात उपस्थित झाले व चव्हाण यांना चर्चेसाठी दालनात बोलवले. यावेळी चव्हाण यांनी कामगारांची बाजू मांडताना देवगड तालुक्याचे बांधकाम उप अभियंता हे निष्क्रिय अधिकारी आहेत. त्यांच्याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झालेली नाही. रस्ता कामगारांबाबत अधिकाऱ्यांच्या मनात उदासीनता आहे हे यातून दिसून येत आहे, असा आरोप केला. रस्ता कामगारांचा पगार अद्याप का झाला नाही? असा प्रश्न उपस्थित केला असता चार दिवस कामगारांचा पगार होण्याच्या दृष्टीने आपणही संबंधित उपअभियंता यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी दोन दिवसात वेतन मिळेल, असे सांगितले होते असे सांगितले. मात्र, कामगारांचा पगार अद्याप झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मला आंदोलन करावे लागले. जोपर्यंत वेतन मिळत नाही, तोपर्यंत आपल्या दालनासमोरून मी हटणार नाही, असा पवित्रा चव्हाण यांनी घेतला. यावेळी देवगड उप अभियंता यांच्याशी श्री. आवटी यानी संपर्क साधून चर्चा केली असता त्यांच्याकडून आज उशिरापर्यंत वेतन दिले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, चव्हाण यांनी आपल्याला देवगड अभियंता यांच्यावर अजिबात विश्वास नाही, त्यामुळे जोपर्यंत पगार झाल्याचे खात्रीशीर समजत नाही, तोपर्यंत माझे हे आंदोलन सुरूच राहील. असा पवित्रा घेतला आहे.
-------------
कोट
रस्ता कामगारांचा वेळेत पगार व्हावा, यासाठी देवगड उपअभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामगारांचा पगार वेळेत व्हावा, या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक आहे; मात्र, त्यांच्याकडून चालढकल झाली आहे. याबाबत त्यांचा खुलासा घेतला जाईल.
- अनिल आवटी, बांधकाम कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.