स्वयंदीप समता प्रतिष्ठान
संस्थाध्यक्षपदी सरमळकर

स्वयंदीप समता प्रतिष्ठान संस्थाध्यक्षपदी सरमळकर

81438
उदय सरमळकर, तुषार कानसे, लाडू पिळगावकर, तानू निकम

स्वयंदीप समता प्रतिष्ठान
संस्थाध्यक्षपदी सरमळकर

ओटवणे, ता. ८ ः शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि इतर सामाजिक उपक्रमांतून गरजूंना आधार देण्याचा उद्देश ठेवून जिल्ह्यातील समाजसेवकांनी एकत्र येत नुकतीच स्वयंदीप समता प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेची स्थापन केली.
या संस्थेची शासनमान्य अधिकृतरित्या नोंदणीही झाली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी उदय सरमळकर (सरमळे, सावंतवाडी), तर उपाध्यक्षपदी तुषार कानसे (इन्सुली, सावंतवाडी) यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या सचिवपदी लाडू पिळगावकर (कुडासे, दोडामार्ग), सहसचिव कृष्णा कांबळे (वाफोली, सावंतवाडी), खजिनदार तानू निकम (तांबोळी, सावंतवाडी), तर सल्लागार म्हणून महादेव जाधव (घावनळे, कुडाळ) यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या उर्वरित कार्यकारिणीत सदस्यपदी दामोदर रेडकर (इन्सुली सावंतवाडी), श्रीराम जाधव (मडुरा, सावंतवाडी), आनंद जाधव (ओटवणे सावंतवाडी), अरविंद जाधव (दोडामार्ग), विधी तेंडोलकर (तेंडोली, कुडाळ) यांचा समावेश आहे. समाजासाठी काहीतरी काम करण्याची इच्छा व तळमळत असलेल्यांनी सहकार्य करून संस्थेच्या सामाजिक मोहिमेत सहभागी होत आपलेही योगदान द्यावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय सरमळकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com