गुहागर नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी

गुहागर नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी

Published on

गुहागर नगर पंचायतीच्या
सर्वसाधारण सभेची मंजुरी
गुहागर, ता. ८ : नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेने गुहागर शहराच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. आता नगर पंचायत प्रशासन नागरिकांना हरकती, सूचना मांडण्यासाठीचा कालावधी निश्चित करून विकास आराखडा प्रसिद्ध करेल.
नगर रचनाकार विभाग रत्नागिरीच्या अधिकार्यांनी दोन महिन्यांनपूर्वी गुहागर शहराचा विकास आराखडा नगर पंचायतीकडे सूपुर्त केला होता. त्यानंतर नगरपंचायतीने विकास आराखडा समजून घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये असे लक्षात आले की, सद्यस्थितीतील जमीन वापर आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर लोकप्रतिनिधी व जनतेने सांगितलेल्या सुधारणा, बदल, त्रुटी मधील काही गोष्टी सुधारल्या गेल्या नव्हत्या. तसेच विकास आराखड्यात निवासी वापरासाठीचे क्षेत्र ही अत्यल्प होते. त्यामुळे सदर विकास आराखड्यावर अभ्यास करून लोकप्रतिनिधीनी बदल सुचवावेत. त्या दुरुस्त्या करून नगररचनाकार विभागाने पुन्हा विकास आराखडा द्यावा.
या निर्णयानंतर नगराध्यक्षा राजेश बेंडल व सर्व नगरसेवकांनी या आराखड्याचा अभ्यास केला. पश्चिमेला समुद्र व सीआरझेडची मर्यादा, शहरातून जाणारा सागरी महामार्ग व पुर्वेला डोंगर अशी भौगोलिक रचना असल्याने शहराच्या वाढीसाठी हरित क्षेत्र कमी करून निवासी क्षेत्र वाढवावे. त्यासाठी काही आरक्षणांमध्ये फेरबदल करावा. शहरांतर्गत रस्त्याची रुंदी कमी करावी. अशा काही सूचना नगरपंचायतीने नगररचनाकार विभागाला कळवल्या. नगराध्यक्ष बेंडल यांनी नगररचनाकार विभागाच्या कोकण आयुक्तांपर्यंत सर्व अधिकार्यांना भेटून नगरपंचायतीची भूमिका सांगितली. नगररचनाकार विभागाने नगराध्यक्ष राजेश बेंडल यांची भूमिका मान्य केली. सुधारित विकास आराखडा नगरपंचायतीला दिला. या आराखड्याला आज नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली आहे. आता नगरपंचायत प्रशासन हा विकास आराखडा प्रसिद्ध करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.