
पाट हायस्कूलमध्ये आकाश दर्शन कार्यक्रम
swt92.jpg
81518
पाटः येथील हायस्कूलमध्ये आकाश दर्शनावेळी उपस्थित विद्यार्थी.
पाटमध्ये आकाश दर्शन कार्यक्रम
कुडाळः पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाचा अनुभव घेतला. शाळेतील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पाट हायस्कूलच्या मैदानावर आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दुर्बिणीच्या मदतीने ए. के. हाक्के यांनी चंद्र, ग्रह, तारे विद्यार्थ्यांना दाखवून त्याबद्दल माहिती दिली. विद्यालयाचे माजी विद्यार्थी लक्ष्मण गोसावी यांनी प्रोजेक्टरवर ग्रह, तारे, नक्षत्र व राशी यांचे दर्शन घडविले. त्यांनी आकाशगंगा, आपली सूर्यमाला, त्यातील ग्रह, तारे यांची वैशिष्ट्ये नक्षत्र व राशींना पडलेली नावे आणि आपली जन्मरास कशी काढतात? याविषयी माहिती दिली. यावेळी विद्यालयातील आयटी शिक्षक योगेश कासकर यांनी मदत केली. कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष समाधान परब, संस्था खजिनदार देवदत्त साळगावकर, पाटगावचे माजी सरपंच मंदार प्रभू, शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, विद्यालयातील शिक्षक, पंचक्रोशीतील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
-------------
पै स्कूलचे आज स्नेहसंमेलन
कुडाळः येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलचा गुणगौरव, विविध गुणदर्शन सोहळा व स्नेहसंमेलन उद्या (ता.10) होणार आहे. 58 महाराष्ट्र बटालियनचे (एनसीसी) सीओ दीपक दयाळ, ओरोस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. वार्षिक गुणगौरव सोहळा सकाळी नऊ ते बारा व विविध गुणदर्शन भर कार्यक्रम सायंकाळी 6.30 ते 10.30 या वेळेत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणातील रंगमंचावर आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सीबीएसई बोर्डाच्या सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे यांनी केले आहे.
...............