
सेंट्रल इंग्लिश स्कूलचे विज्ञान प्रदर्शनात यश
swt९६.jpg
८१५२२
सावंतवाडी : शीतर मोरजकर यांना शुभेच्छा देताना मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ व अन्य.
सेंट्रल इंग्लिश स्कूलचे
विज्ञान प्रदर्शनात यश
सावंतवाडी, ता. ९ः जिल्हा परिषद व शिक्षण विभागातर्फे आयोजित ५० वे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२ - २३ येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये झाले. या विज्ञान प्रदर्शनात येथील सेंट्रल इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय यश प्राप्त केले. शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभागात प्रशालेच्या विज्ञान विषयशिक्षिका शीतल मोरजकर यांच्या ''वर्ल्ड ऑफ अॅटम'' या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. त्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी,मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ कार्यकारिणी समितीचे पदाधिकाऱ्यांनी प्रशालेच्या विज्ञान विषयशिक्षिका मोरजकर यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.