संत रोहिदास महाराजांचा आदर्श जोपासा

संत रोहिदास महाराजांचा आदर्श जोपासा

swt97.jpg
81523
पणदूरः संत रोहिदास महाराज जयंती कार्यक्रमाचे उद्धाटन करताना पंढरी चव्हाण, बाबल पावस्कर, दत्ता गायकवाड, भारत पेंडूरकर आदी. (छायाचित्रः अजय सावंत)

संत रोहिदास महाराजांचा आदर्श जोपासा
पंढरी चव्हाण ः पणदूर येथे चर्मकार समाजातर्फे अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. 9 ः आपला चर्मकार समाज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय चर्मकार समाज कटिबध्द आहे. प्रत्येकाने संत रोहिदास महाराजांचा आदर्श जोपासून वाटचाल करावी, असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई राज्याध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले. यावेळी समाजातील ज्येष्ठांना सन्मानित करण्यात आले.
संत रोहिदास महाराज जयंतीचे औचित्य साधून भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र-मुंबई यांच्या वतीने पणदूर येथील महाविद्यालयाच्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सिने नाट्य अभिनेते अभय खडपकर, प्रशासकीय अधिकारी दत्ता गायकवाड, समाजाचे युवा कोकण अध्यक्ष तथा उद्योजक बाबल पावस्कर, राज्य उपाध्यक्ष प्राजक्त चव्हाण, जिल्हाध्यक्ष भारत पेंडूरकर, राज्य पदाधिकारी मालिनी चव्हाण, रघुनाथ चव्हाण, मानसी चव्हाण, गणपत चव्हाण, सहदेव चव्हाण, मंगेश चव्हाण, अंकुश चव्हाण, प्रिया चव्हाण, आकांक्षा चव्हाण, श्री. देवरुखकर, समाजाचे पदाधिकारी, महिला वर्ग तसेच महिला बचतगटाच्या स्नेहा दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी पंढरी चव्हाण म्हणाले, "आपला समाज राज्यात मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. समाजातील लोक इतर समाजांत वावरताना ताठ मानेने जगला पाहिजे. आपण सक्षम असल्यामुळे आपला समाज विकासाच्या दृष्टीने वाटचाल कसा करेल, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. संत रोहिदास महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून भविष्यात तळागाळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आपल्या समाजाचा विद्यार्थी सर्व क्षेत्रांत उंच भरारी कसा घेईल, या दृष्टिकोनातून सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे." सिने नाट्य अभिनेते खडपकर यांनी महात्म्यांचे विचार आत्मसात करा. संतांनी आपल्याला समतेची शिकवण दिली आहे. समाजाने या संतांचा आदर्श जोपासला पाहिजे, असे सांगितले. दत्ता गायकवाड यांनी भक्तिमार्गाने समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. संत रोहिदासांच्या चरित्राचा आणि कार्याचा अभ्यास येथील मुलांनी करून त्यांचा आदर्श जोपासल्यास यश नक्कीच मिळेल, असे सांगितले. सूत्रसंचालन जिल्हा पदाधिकारी रघुनाथ चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष पेंडूरकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com