भडगावमध्ये महिलांना खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण

भडगावमध्ये महिलांना खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण

swt९१६.jpg
८१५७७
भडगावः येथे प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या महिला व मार्गदर्शिका प्रियांका शेट्ये.

भडगावमध्ये महिलांना
खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ः कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत भडगाव बुद्रुक यांच्यावतीने भडगाव ग्रामपंचायत येथे १५ वा वित्त आयोगांतर्गत बचतगटातील महिलांना मोफत खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महिला, शेतकरीवर्ग व युवकांना स्वयंरोजगारामिभुख प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्था सर्वतोपरी सहकार्य करत असते. या प्रशिक्षणात बचतगटातील ३२ महिलांनी सहभाग घेतला. फेनोरी, खाजा, चकली, शेव, शंकरपाळी, बालुशाही आदी खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले. या शिबिरासाठी प्रियांका शेट्ये प्रशिक्षक म्हणून लाभल्या. यावेळी संस्थेचे समन्वयक समीर शिर्के यांनी महिलांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले. ग्रामसेवक अनिला घुगरे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
भडगावच्या सरपंच प्रणिता गुरव यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या व कोकण संस्थेचे आभार मानले. या प्रशिक्षणाला उपस्थित सर्व महिलांना संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण कला व शिक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, प्रदीप पवार, भावना साटम तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com