भाविकांसाठी लांजात मोफत चहा-नाश्त्याची सोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाविकांसाठी लांजात मोफत चहा-नाश्त्याची सोय
भाविकांसाठी लांजात मोफत चहा-नाश्त्याची सोय

भाविकांसाठी लांजात मोफत चहा-नाश्त्याची सोय

sakal_logo
By

rat०९१९.txt

(टुडे पान ३ साठी)

भाविकांसाठी लांजात मोफत चहाची सोय

भराडीनदेवी यात्रा ; मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचा उपक्रम

लांजा, ता. ९ ः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडीन देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सलग पाचव्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर लांजा हायस्कूल येथे मोफत चहा-नाश्त्याची सोय केली. जातिभेदाच्या भिंती बाजूला सारून केवळ सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यात्रेसाठी जाणाऱ्या हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.
हम सबके, सब हमारे हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा या संस्थेने खऱ्या अर्थाने गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. कोरोना काळात रुग्णांना मदत करणे असो किंवा चिपळूण, महाड येथील पूरग्रस्तांना मदत या प्रत्येकवेळी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीने जातीभेदाच्या पलीकडे जाऊन आपले सामाजिक योगदान दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडी येथील भराडीन देवीच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात मुंबई-पुणे व इतर भागातून चाकरमानी आणि भाविक हे सिंधुदुर्गात दाखल होतात. यात्रेसाठी येणाऱ्या या भाविकांसाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटी ही गेल्या चार वर्षांपासून मोफत चहा नाष्ट्याची सोय करत आहे. या वर्षी सलग पाचव्या वर्षी या भाविकांसाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्यावतीने गेल्या दोन दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर लांजा हायस्कूल या ठिकाणी तंबू उभारून प्रवाशांना मोफत चहा-नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिली होती. दिवसरात्र या संस्थेने भाविकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने आपल्या सामाजिक एकतेचे दर्शन घडवले आहे. भाविकांनी या ठिकाणी थांबून चहा-नाश्ताचा लाभ घेतला आणि सोसायटीच्या सर्व पदाधिकारी सदस्यांना विशेष धन्यवाद दिले.
या उपक्रमासाठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक, उपाध्यक्ष ताज मोहम्मद मुजावर, सचिव राजू नाईक, खजिनदार सईद खान, युवा अध्यक्ष अकिब मुजावर, इब्राहिम वनू, शानू नाईक, महिलाध्यक्ष दिलशाद नाईक, आयेशा बागवान, शाहीन खान, मुस्तफा दसुरकर, गणी दसुरकर, अरमान कादरी, नियात (बंटी) मुजावर, लाला मुजावर या युवकांनी विशेष मेहनत घेतली. हा उपक्रम पार पाडण्यासाठी मुस्लिम वेल्फेअर रत्नागिरीचे अध्यक्ष तथा रत्नागिरी न. प. चे माजी नगरसेवक सोहेल मुकादम आणि वरिष्ठ पत्रकार संस्थेचे सल्लागार रमजान गोलंदाज आणि प्रसिद्ध उद्योजक समीर घारे यांचे संस्थेला मार्गदर्शन लाभले.
--