राजापूर अर्बनच्या निवडणुकीत प्रसार मोहरकरांची विजय

राजापूर अर्बनच्या निवडणुकीत प्रसार मोहरकरांची विजय

rat०९२३.txt

बातमी क्र..२३ (टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat९p१२.jpg ः
८१५५०
राजापूर ः प्रसाद मोहरकर यांचे अभिनंदन करताना बी. के. गोंडाळ, संदीप घेवडे आणि सहकारी.
---

प्रसाद मोहरकर यांचा सत्कार

राजापूर, ता. ९ ः सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजापूर अर्बन बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भटक्या विमुक्त जातीजमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी या राखीव जागेवरून सहकार पॅनेलचे उमेदवार आणि जुवाठीचे सुपुत्र प्रसाद मोहरकर हे सलग दुसऱ्‍यांदा भरघोस मतांनी निवडून आले आहेत.
राजापूर अर्बन बँकेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झाली असून, त्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकत सहकार पॅनेलने वर्चस्व राखले आहे. त्यामध्ये सहकार पॅनेलकडून मोहरकर यांनी निवडणूक लढवताना दुसऱ्‍यांदा संचालक म्हणून बँकेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये सहकारी संचालक आणि प्रशासनाच्या साथीने सर्वसामान्यांपर्यंत जास्तीत जास्त बँकिंग सुविधा पोहचवण्याचे आणि त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. सभासदांनी दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरवताना सहकारी संचालक आणि प्रशासनाच्या सहकार्याने बॅंकेला भविष्यामध्ये अधिक भरभराटीला आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस मोहरकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांचे सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com