रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

(टुडे 1संक्षिप्त पट्टा)

देव, घैसास, कीर महाविद्यालयात
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास,कीर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शुद्धलेखन उपक्रम, मातृभाषेचे महत्त्व या विषयावर निबंध लेखन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, स्वरचित काव्यवाचन, काव्यमंच या विविध उपक्रम घेण्यात आले. निबंध लेखन स्पर्धेत प्रथम वर्ष कला शाखेची दिव्या निळे हिने प्रथम क्रमांक मिळविला. तृतीय वर्ष कला शाखेची वैष्णवी बाणे द्वितीय तर द्वितीय वर्ष कला शाखेची समिक्षा बिर्जे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्याचे अभिनंदन प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, मराठी विभागप्रमुख सौ. अनन्या धुंदूर, कला शाखाप्रमुख ऋतुजा भोवड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
-----------------

डॉ. सुर्वे यांच्या स्मरणार्थ
माहेर संस्थेत उपक्रम
रत्नागिरी : येथील माहेर संस्थेमध्ये मुले, मुली, महिला व पुरुष असे मिळून 150 लोक राहतात. या सर्वांना (कै.) डॉ. ओमकार सुर्वे यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी आदिती सुर्वे, वडील रमेश सुर्वे आणि आई सौ. राजश्री सुर्वे यांनी मदत केली. या वेळी त्यांच्या वतीने सर्वांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे व कर्मचारी तसेच सर्व प्रवेशितांनी आभार व्यक्त केले.

सेवा सामाजिक संस्थेत
माता रमाईंची जयंती
रत्नागिरी : सेवा सामाजिक विकास संस्था स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामध्ये माता रमाई यांची 125 वी जयंती उत्साहात साजरी झाली. प्रमुख अतिथी म्हणून सुहास पाटणकर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माता रमाई यांची व्यक्तिरेखा त्यांनी मांडली. या कार्यक्रमाला सरळ सेवा भरती व आयबीपीएसचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी उपस्थित होते. गौरी पवार आणि विश्वास लटके यांनी सूत्रसंचालन केले. मानसी मोहिते, सुरज पवार, तेजल कांबळे, राहुल नाडे यांनी माता रमाई यांची पुण्याई मांडली. पौर्णिमा कांबळे यांनी कणखर माता रमाई यांचे वर्णन केले. आशुतोष कांबळे, प्रांजली कांबळे, तेजस्विनी पवार, दिलराज कदम, तेजस कदम, प्रतिक पवार, यश सकपाळ या विद्यार्थ्यानी माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गीत, शायरी सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. या वेळी प्रशांत ठाकूर, ललित कांबळे, आरोही सुर्वे, अनिता हाके, उमेश जोशी उपस्थित होते.