कुडाळ नगरपंचायतीचे पाणी दर न परवडणारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ नगरपंचायतीचे पाणी दर न परवडणारे
कुडाळ नगरपंचायतीचे पाणी दर न परवडणारे

कुडाळ नगरपंचायतीचे पाणी दर न परवडणारे

sakal_logo
By

कुडाळ नगरपंचायतीचे
पाणी दर न परवडणारे
गुरुनाथ कुलकर्णींचा आरोपः मुबलक साठा असूनही प्रकार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ः देवगड, वेंगुर्ले व कणकवलीमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य असूनही या तालुक्यांमध्ये पाण्याचे प्रति युनिट दर ग्राहकांना परवडणारे आहेत; मात्र भंगसाळ नदीसारखा जलस्रोत असताना कुडाळ नगरपंचायतीचे प्रति युनिट दर १७ रुपये का, असा सवाल ज्येष्ठ नागरिक गुरुनाथ कुलकर्णी यांनी केला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, कणकवलीने नवे स्रोत शोधून जनतेला केवळ वार्षिक ८०६ रुपये व प्रति महिना ७० रुपयाने मुक्त पाणी पुरवले. कुडाळला भंगसाळ नदीच्या रुपाने प्रचंड पाणी असूनही १ ऑक्टोबर २०१७ पासून प्रति एक हजार लिटरला १७ रुपये आकारून नगरपंचायत काय साध्य करत आहे, असा प्रश्न कुलकर्णी यांनी केला आहे. दरडोई ७० लिटर पाणी पुरवले असून दोन महिन्यांत १२ युनिट २०० रुपये व पुढील १२ ते २१ प्रति एक हजार लिटरला १७ व २१ रुपयांच्या पुढे १८ रुपये आकारणी करत आहे. अर्जातील मागणी ६ युनिटला १०० रुपये ते १२ युनिटला १०० रुपये धरून करावी. कणकवलीच्या जनतेने संघर्ष करून स्वस्त दरात पाणी मिळवले आहे. त्यामुळे ''थांबला तो संपला, काळ मागे लागला'' या उक्तीप्रमाणे येथील १७ ही प्रभागांनी न थांबता संघर्ष करायला हवा, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.