संक्षिप्त-मालवणात 26 ला
स्वरचित काव्यवाचन

संक्षिप्त-मालवणात 26 ला स्वरचित काव्यवाचन

संक्षिप्त

मालवणात २६ ला
स्वरचित काव्यवाचन
मालवण ः मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण संचलित येथील साने गुरुजी वाचन मंदिरातर्फे २६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता बॅ. नाथ पै सेवांगण येथे जिल्हास्तरीय खुल्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे. कविती मराठी किंवा मालवणी भाषेत २५ ओळींपर्यंत मर्यादित असावी. स्पर्धकांनी २४ फेब्रुवारीपर्यंत आपली स्वरचित कविता बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर, धुरीवाडा, मालवण या पत्त्यावर पाठवावी. विजेत्यांना अनुक्रमे १ हजार, ७०१, ५०१, ३०१, २०१ रुपये आणि प्रमाणपत्रे देण्यात येतील. माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

बॅ. नाथ पै स्कूलचे
आज स्नेहसंमेलन
कुडाळ ः येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलचा गुणगौरव कार्यक्रम, विविध गुणदर्शन सोहळा व स्नेहसंमेलन उद्या (ता. १०) होणार आहे. ५८ महाराष्ट्र बटालियनचे दीपक दयाळ (ओरोस) व अध्यक्ष उमेश गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. वार्षिक गुणगौरव सोहळा सकाळी ९ ते १२ व विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सायंकाळी साडेसहा ते साडेदहा या वेळेत होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बागवे हायस्कूलला
साउंड सिस्टिम भेट
मालवण ः मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल आणि तांत्रिक विद्यालयास १९९२-९३ च्या बारावीच्या इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल बॅचकडून सुमारे १० हजार किंमतीची साउंड सिस्टिम भेट देण्यात आली. या बॅचचा विद्यार्थी व मालवण येथील आर. के. इलेक्ट्रॉनिक्सचे मालक भाई कोयंडे यांनी ही साउंड व्यवस्था सुपूर्द केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सरोज परब, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, विठ्ठल लाकम, मुख्याध्यापक किशोर चव्हाण, सुनील बांदेकर, एन. एस. जाधव, भरत ठाकूर, रमेश पाताडे, शशांक पिंगुळकर, समीर नाईक आदी शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

कोचरा पतसंस्थेचा
रविवारी रौप्यमहोत्सव
मालवण ः कोचरा येथील कोचरा उत्कर्ष (डॉ. शिरोडकर) सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव रविवारी (ता. १२) सकाळी १० वाजता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यानिमित्त सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत आरोग्य शिबिर, मधुमेह, रक्तदाब तपासणी, नेत्रचिकित्सा शिबिर व मोफत चष्मा वाटप होणार आहे. सकाळी १० वाजता स्मरणिकेचे प्रकाशन, सत्कार, सायंकाळी ४ वाजता पतसंस्थेच्या कार्यालयात धार्मिक कार्यक्रम, रात्री ९ वाजता साई कलामंच निर्मित ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा कार्यक्रम होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com