संक्षिप्त-ओरोसला सोमवारी धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-ओरोसला सोमवारी
धार्मिक कार्यक्रम
संक्षिप्त-ओरोसला सोमवारी धार्मिक कार्यक्रम

संक्षिप्त-ओरोसला सोमवारी धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

संक्षिप्त

ओरोसला सोमवारी
धार्मिक कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी ः ओरोस-खालची परबवाडी येथील श्री देव महापुरुष ब्राम्हण मंदिराचा वार्षिक उत्सव सोहळा श्री देव महापुरुष कला व क्रीडा मंडळाच्या वतीने सोमवारी (ता. १३) आयोजित करण्यात आला आहे. वार्षिक उत्सवानिमित्त सकाळी ७ वाजता गणेश पूजन व अभिषेक, ८ वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ४ वाजता हळदीकुंकू, सायंकाळी ६ ते ८ वाजता बोर्डवे येथील पंचरत्न प्रासादिक भजन मंडळाचे बुवा मंगेश बागवे याचे दिंडी भजन, रात्री ९ वाजता सिंधुदुर्ग दत्तमाऊली पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा संयुक्त दशावतार प्रणालीयुक्त ''शेषात्मज गणेश'' हा विनोदी नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. सर्व भाविकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव महापुरुष कला व क्रीडा मंडळाने केले आहे.

मुणगे येथे आज
बाल आनंद मेळावा
मुणगे ः येथील सर्व प्राथमिक शाळांचा बाल आनंद मेळावा व हळदीकुंकू समारंभ उद्या (ता.१०) आयोजित केला आहे.
गावातील जिल्हा परिषदच्या मुणगे नं. १, बांबरवाडी, कारिवणेवाडी, आपईवाडी, लब्देवाडी, सडेवाड, आडवळवाडी या प्राथमिक शाळांचा बाल आनंद मेळावा उद्या सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. यानिमित्त सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, दुपारी २ ते ५ बक्षीस वितरण व विविध कला गुणदर्शन कार्यक्रम, ५ ते ६ पर्यंत महिलांसाठी हळदीकुंकू आदी कार्यक्रम देवी भगवती मंदिर येथे आयोजित केले आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक सर्व प्राथमिक शाळा मुणगे यांनी केले आहे.