
मुख्यमंत्री शिंदे, ब्रिगे. सावंत वाढदिवस कुडाळात सामाजिक उपक्रमांनी साजरा
swt923.jpg
81600
माड्याचीवाडी ः येथील जिव्हाळा सेवाश्रमात साहित्य वाटप करताना वर्षा कुडाळकर व पदाधिकारी. (छायाचित्र ः अजय सावंत)
जिव्हाळा सेवाश्रमात साहित्य वाटप
कुडाळ, ता. ९ ः येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. भविष्यातही सामाजिक बांधिलकी जोपासून अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतले जातील, असे महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना स्थापन केल्यानंतर पहिलाच वाढदिवस जिल्ह्यात साजरा होत आहे. कुडाळ तालुक्याने हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे नियोजन केले. त्यानुसार आज मुख्यमंत्री शिंदे व माजी खासदार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालय तसेच माड्याच्यावाडी येथील जिव्हाळा सेवाश्रम (वृध्दाश्रम) या ठिकाणी फळे, अन्नधान्याचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुका प्रमुख योगेश तुळसकर, उपजिल्हा संघटक निलम शिंदे, अनघा रांगणेकर, गडकरी, श्रीमती अग्रवाल, जयदीप तुळसकर, पुंडलिक जोशी, चैतन्य कुडाळकर, सिद्धेश मोंडकर, महेंद्र सातार्डेकर, अनिरुद्ध गावडे, अरविंद करलकर उपस्थित होते. यावेळी जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थाचालक सुरेश बिर्जे तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.