वर्धापन दिन सोहळा

वर्धापन दिन सोहळा

rat०९१५.txt

(पान २ साठी, संक्षिप्त)

सोळजाई मंदिराचा आज वर्धापनदिन सोहळा

साडवली ः नवसाला पावणाऱ्या देवरूखच्या ग्रामदेवी श्री देवी सोळजाईच्या मंदिर जीर्णोद्घाराचा आठवा वर्धापनदिन सोहळा १० व ११ फेब्रुवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. शुक्रवारी (ता. १०) सकाळी १० ते ११ या वेळेत महाकाली यज्ञ ,११ ते १ सोळजाई भक्तांमार्फत हवनाचा कार्यक्रम, १ ते ३ या वेळेत सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे. ११ ला सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत ग्रामदेवता श्री देवी सोळजाई देवीच्या तसबिरीची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. संपूर्ण शहरातून ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. सर्व भाविक या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दुपारी महाप्रसाद व रात्री देवरूख कुंभारवाडीचे नमन होणार आहे. दोन दिवसाच्या या सोहळ्यात दोन्ही दिवस सुमारे १० हजाराहून अधिक भाविक सहभागी होणार आहेत. देवरूख शहराबरोबर विविध शहरातील भाविक दाखल होणार आहेत.
---

फोटो ओळी
-rat९p४.jpg ः
८१५०९
डॉ. आसावरी भालेकर
--
रशियात भालेकर यांचे वैद्यकीय शिक्षण

साडवली ः देवरूखमधील आसावरी भालेकर यांनी रशियातून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून वैद्यकीय परवाना परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. त्यांचे शालेय शिक्षण देवरूख येथून झाले. पुढील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियातील तांबोव मेडिकल स्टेट युनिव्हर्सिटी नेम आफ्टर डेरझाविन रशिया या विद्यापीठात प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम पूर्ण करून २०२३ ला भारतात परतल्या. त्यानंतर विदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट ही परीक्षा वैद्यकीय परवानासाठी द्यावी लागते. या परीक्षेत त्यांनी प्रथमच प्रयत्नात यश मिळवले आहे. या परीक्षेत सुमारे ३० हजार परीक्षार्थींपैकी पास झालेल्या ९ हजार विद्यार्थ्यांमध्ये आपली जागा निश्चित केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे. जिद्दीने यश मिळवणाऱ्या डॉ. आसावरी यांचे नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक सुशांत मुळ्ये, राधाकृष्ण सेवाभावी मंडळ देवरूख आणि केशव सृष्टी परिसर मंडळाचे अध्यक्ष वसंत भालेकर, उपाध्यक्ष दिलीप पागार, सदस्य शशिकांत काबदुले, मदन वाजे, बळीराम भालेकर, अशोक खेडेकर यांनी अभिनंदन केले.
----

फोटो ओळी
-rat९p९.jpg ः
८१५१४
प्रा. विराज महाजन
---
राज्यशास्त्र अभ्यासमंडळ सदस्यपदी प्रा.महाजन

गुहागर ः येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. विराज महाजन यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती, पुणे) राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्यामार्फत नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र टीपा कोष
निर्मितीचे काम सुरू आहे. तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विषयातील महत्वाच्या संकल्पना विस्तृत स्वरूपात नोंदवण्याचे काम या टीपा कोशाच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती प्रा. महाजन यांनी दिली आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध प्रकाशित केले असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संदर्भ आणि क्रमिक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. पद्मनाभ सरपोतदार यांनी अभिनंदन केले आहे.
--

जमातूल मुस्लिमच्या अध्यक्षपदी गजाली

खेड ः जमातूल मुस्लिम संघटनेच्या अध्यक्षपदी गुलाम हुसैन गजाली तर उपाध्यक्षपदी नासिर मुकादम, सचिवपदी शकील देसाई तर खजिनदारपदी मलिक मुसा यांची निवड झाली आहे. शहरातील मुकादम हायस्कूलच्या बशीरभाई हजवानी सभागृहात झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून ख्वाजा खतीब, गनी मोटलेकर, मुस्तफा मुल्लाजी, अन्वर गजाली, अल्ताफ देसाई, वाहीद उर्फ परवेज मुकादम, हमीद मुसा, माजिद खातीब, किफायत पांगारकर, सगीर घनसार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या सभेला जमातूल मुस्लिम संघटनेच्या कोअर समितीचे लतिफ देसाई, इब्राहीम मुसा, नजीर मुकादम, रफिक मुसा, मेहबूब मोहिमतुले, रियाज देसाई, मुख्तार मुकादम, हनीफ घनसार, सिकंदर मुसा, शमशुद्दिन मुकादम, गौस खतीब यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
-
फोटो ओळी
-rat९p१० ः
८१५३९
गावतळे ः प्लास्टिकविरहित पुष्गुच्छ तयार करणारे आवाशी न. १ शाळेतील विद्यार्थी.
--
आवाशी शाळेत पुष्परचना स्पर्धा

गावतळे ः दापोली तालुक्यातील जि. प. शाळा आवाशी नं. १ येथे कार्यानुभवअंतर्गत स्वनिर्मितीचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता. ८) फेब्रुवारीला प्लास्टिकविरहित पुष्पगुच्छ तयार करून पुष्परचना स्पर्धेत सुंदर असे गुच्छ तयार केले. सर्वांनी उत्तमप्रकारे पुष्परचना केली होती. त्यापैकी विद्यार्थ्यांनीच परीक्षण करून पुढील तीन स्पर्धकांच्या पुष्परचनेची निवड केली. प्रथम क्रमांक रिद्धी शेडगे, द्वितीय नेत्रा शेडगे, तृतीय कन्हैया शेडगे. विजेत्यांना पायल शेडगे हिच्या हस्ते चित्रकला साहित्य बक्षिस देऊन गौरवण्यात आले.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com