फोटोसंक्षिप्त-गोवा रणजी संघाचा रेहान केरकर कर्णधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त-गोवा रणजी संघाचा 
रेहान केरकर कर्णधार
फोटोसंक्षिप्त-गोवा रणजी संघाचा रेहान केरकर कर्णधार

फोटोसंक्षिप्त-गोवा रणजी संघाचा रेहान केरकर कर्णधार

sakal_logo
By

फोटोसंक्षिप्त

81629

गोवा रणजी संघाचा
रेहान केरकर कर्णधार
बांदा, ता. ९ : गोवा राज्याच्या १४ वर्षांखालील रणजी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी सावंतवाडी येथील एम. क्रिकेट अकादमीचा खेळाडू रेहान केरकर (रा. कोरगाव-गोवा) याची निवड झाली. रेहान हा अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित आहे.
गोवा राज्य संघाची निवड चाचणी पार पडली. यामध्ये रेहानची पहिल्या ४० खेळाडूंमध्ये निवड झाली. त्यानंतरच्या मैदानी निवड चाचणी सामन्यात त्याने १००, ६१ व ५८ धावा काढल्या. शतक व सलग दोन अर्धशतकांमुळे त्याची अंतिम १४ खेळाडूंमध्ये निवड झाली. रेहान हा सावंतवाडी येथील एम. क्रिकेट अकादमीत प्रशिक्षक राहुल रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. त्याच्या फलंदाजी व गोलंदाजीमध्ये आमूलाग्र बदल झाला असून त्याने प्रथमच गोवा राज्याच्या निवड चाचणीत सहभाग घेत अप्रतिम कामगिरी केली. त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे त्याची गोवा राज्य संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. गोवा राज्य संघ तामिळनाडू येथे हैद्राबाद, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, मेघालय यांच्या विरुद्ध सामने खेळणार आहे. रेहानच्या निवडीबाबत अकादमीचे अध्यक्ष उदय नाईक, उपाध्यक्ष अक्रम खान यांनी अभिनंदन केले.

81630

‘कृष्णाई’ चषक स्पर्धेत
‘एम क्रिकेट’ विजेता
बांदा, ता. ९ ः सावंतवाडी जिमखाना मैदानावर ११ वर्षांखालील कृष्णाई चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात एम क्रिकेट अकादमी संघाने युनियन क्लब जिमखाना बेळगाव संघावर ४६ धावांनी मात करत विजेतेपद मिळविले. स्पर्धेचे उद्‌घाटन सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी एम क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष उदय नाईक, उपाध्यक्ष अक्रम खान, जिल्हा लेदर बॉल क्रिकेटचे कार्याध्यक्ष चोडणकर, नंदू रेडकर, स्पर्धेचे प्रयोजक उपेश नेवगी आदी उपस्थित होते. अंतिम सामन्यात एम क्रिकेट संघाने निर्धारित ३० षटकांत ६ बाद १४५ धावा केल्या. यात फरान आग ३२, प्रसाद नाईक ३२, ओम मेस्त्री १८, सचिन गावडे १० व उस्मा खान याने नाबाद १९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना जिमखाना बेळगाव संघाने सर्वबाद ९९ धावा केल्या. उस्मा खान २, रितिका बुरुड २, तर अगस्त आजगावकर याने ३ गडी बाद केले. सावंतवाडी संघाने ४६ धावांनी विजयी होत कृष्णाई चषकावर आपले नाव कोरले.