मंडणगड ः अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अँड. शशिकांत पवार यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड ः अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अँड. शशिकांत पवार यांचे निधन
मंडणगड ः अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अँड. शशिकांत पवार यांचे निधन

मंडणगड ः अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अँड. शशिकांत पवार यांचे निधन

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat९p२२.jpg ः KOP23L81586 अॅड. शशिकांत पवार
------
अॅड. शशिकांत पवार यांच्या
निधनाने मंडणगडवर शोककळा
मंडणगड, ता. ९ ः अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अॅड. शशिकांत तथा अप्पासाहेब पवार (वय ८२) यांचे ७ फेब्रुवारीला मुंबई येथे निधन झाले. त्यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने धडपड करणारे ज्येष्ठ नेते अशी त्यांची ओळख होती. ७ फेब्रुवारीला रत्नागिरी येथून परत येत असताना संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते अशी त्यांची ओळख असली तरी बहुजनांची नेहमी बाजू घेणारे अशीही त्यांची ओळख होती. त्याच्या निधनाने मराठा चळवळीतील एक हुशार व संयमी नेता गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे. रत्नागिरी मराठा बिझनसमन फोरमच्या बैठकीसाठी ते मुंबईहून तेथे गेले होते. संध्याकाळी तेथून परत येताना वाटेतच त्यांना पाली परिसरात हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. ८ फेब्रुवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शाहू महाराज, महाराजा गायकवाड आदींच्या पुढाकाराने १९ साव्या शतकाच्या सुरवातीस क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ही संस्था सुरू झाली. या संस्थेचे १९८१ ला अखिल भारतीय मराठा महासंघ असे नामकरण झाले. १९६४ पासूनच पवार या संस्थेत काम करत होते. स्व. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर १९९० सालात पवार यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर या संस्थेमार्फतही त्यांनी १९८० पासून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवले होते. अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था नावारुपाला आणली होती. सर्व मराठा उद्योजकांच्या मराठा बिझनेसमेन फोरम ही संस्था वाढवण्यातही त्यांचा मोठा सहभाग होता.