संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat९p२७.jpg ः KOP२३L८१६१७
दापोली ः समूहनृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी.
---------
विद्याभारतीचे समूहनृत्य स्पर्धेत यश
दाभोळ ः दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित विद्याभारती प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी समूहनृत्य स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले. गजानन महाराज भक्त मंडळ गिम्हवणे येथे गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्त विविध समूहनृत्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विद्याभारती प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी १ली ते ७वी या गटात देशभक्तीपर गीतगायन व शेतकरी नृत्यप्रकारात प्रथम क्रमांक तर कोळी नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनीच गायन, वादन व नृत्य केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व पालकवर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

सर्पमित्रांना दापोलीत गौरवणार
दाभोळ ः वन्यप्राण्यांच्या अनमोल सेवेची दखल घेऊन १४ फेब्रुवारीला पुणे येथे दापोली तालुक्यातील सर्पमित्र किरण करमरकर, प्रीतम साठविलकर, मनीत बाईत, तुषार महाडिक, प्रतीक बाईत, सुरेश खानविलकर, मिलिंद गोरिवले यांना सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. याच सर्पमित्रांना गेल्या वर्षी हिंगोली येथे दी रिअल हिरो अॅवॉर्ड २०२२ ने सन्मानित करण्यात आले होते.
-------------
स्मशानशेडसाठी जामगे-विसापूरमधे ठिय्या आंदोलन
दाभोळ ः जामगे-विसापूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडीसाठी जामगे-विसापूर लघुपाटबंधारे योजनेसाठी संपादित केलेल्या धरणाच्या खालील बाजूस शिल्लक जागेमध्ये स्मशानशेड बांधण्यास परवानगी मिळण्यासाठी १४ फेब्रुवारीला सकाळी ११ वा. उपविभागीय कार्यालयासमोर बिरसा फायटर्सचे जामगे विसापूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून या संदर्भातील निवेदन दापोलीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांना देण्यात आले. शासनाकडून स्मशानशेड बांधण्यासाठी अडीच लाख रुपये मंजूर झालेले असले तरी स्मशानशेड बांधण्यास मनाई असल्यामुळे ही रक्कम परत जात आहे. स्मशानशेड नसल्यामुळे गावात अंत्यसंस्कार करण्यास हेळसांड होत आहे. पावसाळ्यात स्मशानशेडअभावी अंत्यविधी करण्यास अडचण येत असून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना पावसात भिजत उभे राहावे लागते, असे या निवेदनात म्हटले आहे.


शिव बु. हायस्कूलमध्ये आरोग्य मार्गदर्शन

खेड ः तालुक्यातील शिवबुद्रुक येथील नवजीवन हायस्कूलमध्ये लोटे परशुराम हॉस्पिटलच्यावतीने ''कळी उमलताना'' या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. नवजीवन हायस्कूल व कालसेकर इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी केली. मुलींना वैद्यकीय साहित्याचे परशुराम हॉस्पिटलच्यावतीने वाटप केले. डॉ. दीप्ती चव्हाण, सुष्मिता पाटील, डॉ. पायल भोसले, डॉ. प्रियंका खरात, डॉ. नम्रता भुवड, कीर्ती जाधव, सोनिया शिगवण यांचा मुख्याध्यापक इसहाक मणेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आरोग्य विभागप्रमुख मानके, प्रास्ताविक मणेर तर आभार पठाण यांनी मानले.
-------------

संत रोहिदास समाजसेवा संघाच्या स्पर्धांना प्रतिसाद

खेड ः संत रोहिदास समाजसेवा संघ खेड शहर शाखेच्यावतीने शहरातील संत रोहिदास नगर येथे आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत श्रुतिका खेडेकर हिने तसेच संगीतखुर्ची स्पर्धेतील लहान व मोठ्या गटात अनुक्रमे ऋतू कासार, हर्ष पासवान यांनी प्रथम क्रमांक पटकावला. रेकॉर्ड डान्स स्पर्धेत सलोनी खेडेकर, श्रुतिका खेडेकर, निहान खेडेकर, निधी खेडेकर, रूही व नंदिनी खेडेकर ग्रुप, भक्ती खेडेकर, तन्वी खेडेकर ग्रुप, रिशांत खेडेकर, तन्वी व श्रावणी खेडेकर ग्रुप, अवनी खेडेकर, श्रुती खेडेकर, श्रावणी खेडेकर, जय जाधव या स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये तन्वी व श्रावणी खेडेकर ग्रुपने द्वितीय तर भक्ती खेडेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शीतल देवळेकर, अजय निगडेकर, पाताडे यांनी काम पाहिले तसेच संगीतखुर्ची स्पर्धेतील लहान गटात निधी खेडेकर, हर्ष बुधकर तर मोठ्या गटात यश खेडेकर, संदेश देवळेकर यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केला. या वेळी हरी देवळेकर, हर्षदा देवळेकर, सुधीर देवळेकर, सावर्डेकर, साईनाथ खेडेकर यांनी बहारदार गीतगायनाने उपस्थितांची मने जिंकली.