दाभोळ-दापोलीत इलेक्ट्रिशियन असिस्टंट कोर्स सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-दापोलीत इलेक्ट्रिशियन असिस्टंट कोर्स सुरू
दाभोळ-दापोलीत इलेक्ट्रिशियन असिस्टंट कोर्स सुरू

दाभोळ-दापोलीत इलेक्ट्रिशियन असिस्टंट कोर्स सुरू

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat9p28.jpg ः KOP23L81618 दापोली ः इलेक्ट्रिशियन असिस्टंट कोर्सला प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
--------------

दापोलीत इलेक्ट्रिशियन असिस्टंट कोर्स सुरू
दाभोळ, ता. १० ः दापोलीतील (कै.) कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान आणि जनशिक्षण संस्थान रत्नागिरीच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिशियन असिस्टंट हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध कौशल्य आधारित अभ्यासक्रम चालवण्यात येतात. त्याचाच एक भाग असणारे जनशिक्षण संस्थान.
कोकणात हे जनशिक्षण संस्थान चालू करून याच्या माध्यमातून कुशल कामगार, कुशल कारागीर, कुशल व्यावसायिक तयार करावेत यासाठी माजी खासदार सुरेश प्रभू यांनी विशेष प्रयत्न केले. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी दापोली तालुक्यात कौशल्य विकासाचे सर्व उपक्रम जनशिक्षण संस्थानसोबत राबवण्याबाबत सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली व आता प्रत्यक्ष कोर्सेस सुरू होत आहेत. सुरवातीला २० विद्यार्थ्यांची एक बॅच असून अतिशय नाममात्र फीमध्ये हा 3 महिन्यांचा कोर्स घेण्यात येत आहे. या कोर्समध्ये अधिकाधिक भर हा प्रॅक्टिकल प्रशिक्षणावर राहणार असल्याचे प्रशिक्षक मयुरेश गोडबोले यांनी नमूद केले. या प्रसंगी जनशिक्षण संस्थानच्या दापोली समन्वयक नीशा उपलप तसेच सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. हा कोर्स पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सर्वांना केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रमाणपत्र मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना व्यावसायिक कर्ज आणि कुशल कारागीर म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मिहीर महाजन यांनी व्यक्त केला आहे.