वेंगुर्ले गाबीत समाज अध्यक्षपदी दिलीप गिरप यांची निवड

वेंगुर्ले गाबीत समाज अध्यक्षपदी दिलीप गिरप यांची निवड

Published on

swt929.jpg
81655
वेंगुर्लेः दिलीप गिरप यांचा अभिनंदन करताना गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर, सोबत किरण कुबल, भगवान मसुरकर, दादा केळूसकर, सगुण सातोस्कर, विश्वास आरोंदेकर, बाबी रेडकर, नागेश गांवकर.

वेंगुर्ले गाबीत समाज अध्यक्षपदी
दिलीप गिरप यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ९ः येथील गाबीत समाज संस्थेच्या अध्यक्षपदी वेंगुर्ले नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप तर सचिव पदावर किरण कुबल यांची निवड करण्यात आली. मांडवीखाडी येथील नेचर होम स्टे येथे ही बैठक घेण्यात आली.
गाबित समाज सिंधुदुर्ग, शाखा वेंगुर्ला तालुका या संस्थेची बैठक गाबित समाज सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली मांडवी येथील नेचर होम स्टे येथे पार पडली. यात गाबित समाज सिंधुदुर्ग, शाखा वेंगुर्ला तालुका या संस्थेची नुतन कार्यकारीणीची एकमताने निवड करण्यात आली. या कार्यकारीणीत अध्यक्षपदी गिरप, उपाध्यक्षपदी भगवान मसुरकर, सचिवपदी कुबल, सहसचिवपदी नागेश गांवकर, खजिनदारपदी जयंत मोंडकर, महिला प्रतिनिधी श्वेता हुले, ईशा मोंडकर, सदस्यपदी बाबी रेडकर, अनंत केळुस्कर, सगुण सातोस्कर, विकास आरोंदेकर यांचा समावेश आहे.
उपरकर यांनी अखिल भारतीय गाबित समाज महासंघ, मुंबई आणि जिल्हा संघटनेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. तालुक्यातील विशेषत: किनारपट्टी भागातील सर्व गावांतील गाबीत समाज बांधवांना एकत्रित आणून संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यासाठी तालुक्यातील मच्छिमारी वसाहतीतील प्रमुख प्रतिनिधींची नियोजन बैठक उद्या (ता. ११) सकाळी ११ वाजता मांडवी नेचर होम स्टे येथे घेण्याचे निश्चित केलेली आहे. अखिल भारतीय गाबित समाज संघटनेतर्फे येत्या एप्रिलमध्ये गाबित समाजाचा महोत्सव मालवण-दांडी येथे भरविण्यात येणार आहे. यामध्ये वेंगुर्ले येथून मोठया संख्येने समाज बांधवांनी सहभाग घेण्याचे आवाहन उपरकर यांनी येथे केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.