रत्नागिरी ःमहाराष्ट्र पत्रकार कायद्यान्वयेही आंबेरकरवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ःमहाराष्ट्र पत्रकार कायद्यान्वयेही आंबेरकरवर कारवाई
रत्नागिरी ःमहाराष्ट्र पत्रकार कायद्यान्वयेही आंबेरकरवर कारवाई

रत्नागिरी ःमहाराष्ट्र पत्रकार कायद्यान्वयेही आंबेरकरवर कारवाई

sakal_logo
By

पान १ साठी
लोगो
पत्रकार वारीशेचा मृत्यू


पत्रकार कायद्यान्वयेही आंबेरकरवर कारवाई
पालकमंत्री उदय सामंत; कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशेंच्या मृत्यूप्रकरणी संशयिताच्या विरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हे कृत्य करणाऱ्‍‍यांविरोधात महाराष्ट्र पत्रकार कायद्यान्वयेही कारवाई करण्यात येणार असून, याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्‍यांकडे सोपवला आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. तो रिफायनरीचा समर्थक असो किंवा विरोधक, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सामंत म्हणाले, ‘‘राजापुरातील पत्रकार शशिकांत वारीशे याच्या संदर्भात झालेली ही घटना अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी, अशी सूचना केली आहे. यामध्ये पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. या घटनेचा पालकमंत्री म्हणून मी निषेध करतो. ज्याने हा प्रकार घडवला त्याची चौकशी झाली असून, त्याने पोलिसांना माहिती दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यतिरिक्त आणखी कोणी असेल असे वाटत नाही. पोलिसांनी संबंधित गुन्हेगारावर मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने पत्रकारांसाठी केलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई होणार आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करणार आहेत, तसेच भविष्यात असा प्रकार घडू नये, यासाठी कडक कारवाई केली जाईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.’’


संशयित कोठडीतून
जिल्हा रुग्णालयात
पोलिस कोठडीमध्ये असलेला संशयित पंढरीनाथ आंबेरकर याला छातीत दुखू लागल्याने आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्याला बुधवारी (ता. ८) दुपारनंतर जिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या बंदोबस्तात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिस यंत्रणा आता पुरावे गोळा करू लागली आहे.