भरणी येथे मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरणी येथे मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
भरणी येथे मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

भरणी येथे मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

भरणी येथे मारहाण प्रकरणी
एकावर गुन्हा दाखल
कणकवली, ता. १०ः भरणी येथे किरकोळ कारणावरून मारहाण केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दखल केला आहे.
धोडू अनंत गुरव (वय ६०,रा, भरणी गावठणवाडी ता. कणकवली) असे संशयीत आरोपींचे नाव आहे. ही मारहाणीची घटना बुधवारी (ता. ८) साडेदहाच्या सुमारास झाली आहे.
याबाबत अविनाश विश्वनाथ गुरव (वय ३०, रा.भरणी गावठणवाडी) यांनी येथील पोलीसात तक्रार दाखल केली आहे. अविनाश यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रात्री साडेदहा सुमारास मी माझ्या घरात असताना माझे काका धोंडु गुरव हे दारू पिवून येवुन मला व माझ्या आई वैशाली हिला विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी काका धोंडु गुरव यांना तुम्ही शिवीगाळ करु नका असे सांगीतले असता त्याचा त्यांना राग आला व त्यांनी घराच्या मागील पडवीत ठेवलेला लोखंडी कोयता घेवुन येवून माझ्या डावे हाताच्या बोटावर मारुन दुखापत केली. यावेळी आई वैशाली व बहीणी स्वाती असे मला सोडविणेसाठी आले असता काका धोंडु गुरव यांचे हातातील कोयता माझ्या आईच्या डावे हाताच्या मनगटावर, डावे हाताच्या बोटावर तसेच उजव्या डोळयाचे भोईजवळ लागून दुखापत झालेली आहे. त्यांनतर आमच्या ओरडण्याच्या आवाजाने वाडीतील गणपत गुरव, मंगेश पालकर, समिर गुरव असे आमच्या घरी आले व त्यांनी आम्हाला सोडवीले. त्यानंतर मी आमच्या गावचे पोलीस पाटील आनंद ताम्हणकर व सरपंच अनिल बागवे यांना फोन करुन घरी बोलावुन त्यांना घटनेबाबत माहीती दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.