
तळवडेत रंगणार ग्रामीण साहित्य संमेलन
rat१०१७.txt
बातमी क्र. १७ (टुडे पान २ साठीमेन)
फोटो ओळी
-rat१०p१९.jpg-
८१७६०
तळवडे ः ग्रामीण साहित्य संमेलनाला येणाऱ्या साहित्यप्रेमीं, मान्यवरांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेली स्वागत कमान.
--
तळवडेनगरी ग्रामीण साहित्य संमेलनासाठी सज्ज
आज ग्रंथदिंडीने सुरवात ; शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, दगडी शिल्प प्रदर्शनाचे आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १० ः अणुस्कुरा घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या व राजापूरची जीवनदायिनी अर्जुना नदीच्या काठावर वसलेल्या तळवडे गावातील गुरूवर्य स्व. महादेव कुंडेकर साहित्य नगरीत संघ आणि तळवडे ग्राम वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन उद्या (ता. ११) होणार आहे. या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.
या संमेलनातून ग्रामीण साहित्य संस्कृतीच्या अभिसरणासोबत ग्रामीण भागातील प्रतिभाशक्तीला, सर्जनशीलतेला मोठा वाव मिळाला आहे. पाचल येथील मनोहर खापणे महाविद्यालयात शिक्षण घेणा-या महाविद्यालयीन युवक-युवतींनी लिहिलेल्या कवितांचे संकलन असणारे ४० कवितांचे विकास पाटील यांनी संपादित केलेल्या ''काव्योदय'' या कवितासंग्रहाचा प्रकाशनाचा हा क्षण या महाविद्यालयीन मुलामुलींना कवि-कवयित्री झाल्याचा आनंद देणारा ठरणार आहे. महाविद्यालयीन वयातच या मुलांचे पुस्तक प्रकाशित झाल्याने त्यांच्यातील भावी साहित्यिक जडणघडणीस प्रोत्साहन मिळणार असून यातून उद्याचे साहित्यिक घडणार आहेत, यादृष्टीने हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
संमेलनात क्रांतीज्योत फेरी, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, कोकणचा निसर्ग मांडणारे छायाचित्र प्रदर्शन, दगडी शिल्प प्रदर्शन, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले अमूर्त चित्र प्रदर्शन, काव्यसंमेलन, नामवंत साहित्यिकांचा परिसंवाद, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुस्तक प्रकाशन, कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान सोहळा, कोकणात स्थायिक झालेल्या तरुणांशी विवाह करणाऱ्यां वधूंचा सत्कार, लोककला व मनोरंजन कार्यक्रम आदी कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. सकाळी ग्रंथदिंडीने सुरवात होणार आहे. १२ ला विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे. संमेलनाचे उदघाटन इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. श्रीधर टाकूरदेसाई यांच्या हस्ते होणार आहे.
या परिसरातील अणुस्कुरा घाट,अर्जुना धरणाचा विहंगम परिसर ,रायपटणचे सिंहनादाचा अवर्णनीय आनंद देणारे संगनाथेश्र्वर मंदिर, रेवणसिद्ध मठ, तळवडेतील शतकोत्तरी दत्त मंदिर,आदी ठिकाणे पर्यटनदृष्ट्या समृद्ध आहेत. स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या पर्यटन समृद्ध तळवडे -पाचल -रायपटण या १५-२० गावातील परिसराच्या पर्यटनात्मक वृद्धीसाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा दृष्टीने यातून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
---
कोट
रत्नभूमीतील राजापूर-लांजा या दोन तालुक्यांची प्रातिनिधीक संस्था परिसरातल्या साहित्यप्रेमींना एकत्रित करून साहित्याचा निखळ आस्वाद देणारी ग्रामीण सहित्य संमेलने आयोजित करते याचे कौतूक वाटते. ऐतिहासिक राजापूर तालुक्यात तळवडे येथे होणाऱ्या संमेलनाचा मी संमेलनाध्यक्ष होणे हा मी आयुष्यभर ग्रंथालयात केलेल्या सेवेचा बहुमान आहे.
--प्रकाश देशपांडे, संमेलनाध्यक्ष, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन तळवडे
--------------------------