Wed, March 22, 2023

कणकवलीत रविवारी बैलगाडा शर्यत
कणकवलीत रविवारी बैलगाडा शर्यत
Published on : 10 February 2023, 12:16 pm
कणकवलीत रविवारी बैलगाडा शर्यत
कणकवली, ता. १० : श्री विश्वकर्मा मित्रमंडळाच्यावतीने कणकवलीत रविवारी १२ फेब्रुवारीला राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा होणार आहे. शहरातील श्री स्वयंभू मंदिरानजीकच्या मैदानात या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेत १५ हजार रूपयांचे प्रथम पारितोषिक, १० हजार रूपयांचे द्वितीय पारितोषिक आणि ५ हजार रूपयांचे तृतीय पारितोषिक दिले जाणार आहे. याखेरीज या तिन्ही संघांना आकर्षक चषक दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी नितीन पांचाळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री विश्वकर्मा मित्रमंडळाने केले आहे.