
मंडणगड - बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या डंपरची चाके झाली वरती
rat107.txt
बातमी क्र..7 (टुडे पान 1 साठी)
फोटो ओळी
-Rat10p15.jpg ः KOP23L81753 देव्हारे ः ओव्हरलोडमुळे डंपरची पुढीस चाके वर उचलली.
-----------
बॉक्साईट वाहतूकीच्या
डंपरची पुढील चाके उचलली
देव्हारे येथील घटना; ओव्हरलोड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
मंडणगड, ता. 10 ः देव्हारे येथे बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या एका डंपरची पुढील दोन्ही चाके वरती झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध असताना डंपरची वाहतूक सुरू असल्याच्या चर्चेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. विविध समस्यांचे कारण असलेली विनापरवाना ओव्हरलोड बॉक्साईट वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न तालुक्यात पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागला आहे.
तहसील कार्यालयासह सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे तालुक्यात अनेक संस्था व व्यक्तीगतरित्या लेखी व तोंडी रितसर तक्रार होऊनही सर्व यंत्रणा बेकायदेशीर वाहतुकीकडे कानाडोळा करत असल्याने सर्वच यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात फसल्या आहेत. गुरुवारी रात्री देव्हारे येथे अपघात घडल्यानंतर रस्त्यावर सांडलेले बॉक्साईट खनिज बाणकोट सागरी पोलिस ठाण्याच्यावतीने बाजूला करण्यात आली व रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त झालेली आहे. प्रशासकीय यंत्रणांनी सोईस्करपणे कानाडोळा केल्याने भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांची स्थानिक यंत्रणेस पुरेशी जाण असतानाही ओव्हरलोड वाहतूक सुरूच राहिलेल्या स्थानिक जनतेत या विषयी नाराजी आहे. तालुक्यातील एकमेव राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली पाच वर्षे रखडलेली असताना या मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने नादुरुस्त असलेल्या तुळशी येथील पुलाचे काम महामार्ग प्राधिकरणाने हातात घेतले. एरवी तालुकावासीय येथील समस्यांबद्दल घसा फोडून ओरडत असताना झोपी गेलेली यंत्रणा मायनिंगचे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याकरिता कार्यतत्पर झालेली दिसून आल्याने जनतेची नाराजी अधिक तीव्र झाली आहे. पावसाला सुरवात होत असताना वाहतूक बंद होणार हे निश्चित आहे. त्यास अजूनही शंभर ते सव्वाशे दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. या कालवधीत सुमारे शंभर डंपर वाहतूक करत राहणार हे आता जवळ जवळ स्पष्ट आहे. त्यामुळे पाले ते मंडणगड तुळशीघाट हा रस्ता आणखीन नादुरुस्त होणार आहे.
------ बातमीदार - सचिन माळी...10.2.2023---------