लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी तुषार नाईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी तुषार नाईक
लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी तुषार नाईक

लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी तुषार नाईक

sakal_logo
By

wt1019.jpg
81815
वेंगुर्लेः मोचेमाड येथे लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी तुषार नाईक यांची निवड झाल्याबद्दल भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

लोककला अनुदान शिफारस
समिती सदस्यपदी तुषार नाईक
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १०ः लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी किंवा प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी राज्याकडून शासन निर्णयाद्वारे समिती पुनर्गठित केली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ मोचेमाडचे संचालक तुषार नाईक यांची समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल भाजप वेंगुर्लाच्यावतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यातील सर्व लोककला टिकून राहाव्यात व लोककलांची माहिती पुढील पिढीला व्हावी आणि सर्व पारंपारिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन द्यावे, या हेतूने त्यांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी किंवा प्रयोगासाठी अनुदान देण्याच्या योजनेस शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली होती. या कलापथकांच्या अर्जाची छाननी करणे व त्यांची नियमानुसार पात्रता तपासून निवड करण्यासाठी निवड समिती गठीत करण्याची तरतुद होती. त्याअनुषंगाने राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी किंवा प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीच्या अध्यक्षपदी असून सदस्यपदी दशावतार कला प्रकारासाठी नाईक - मोचेमाडकर व देवेंद्र नाईक यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती शासन निर्णय दिनांकापासून पुढील ३ वर्ष कालावधीसाठी किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत कार्यरत राहणार आहे, असा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
मोचेमाड येथील निवासस्थानी नाईक यांचा भाजपच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, सरपंच संघटनेचे पपू परब, बाबल नाईक, मोचेमाड माजी सरपंच रसिका गावडे, मोचेमाड बुथ प्रमुख उदय गावडे, नारायण गावडे उपस्थित होते.