कायदेविषयक मार्गदर्शनासाठी मोबाईल व्हॅन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कायदेविषयक मार्गदर्शनासाठी मोबाईल व्हॅन
कायदेविषयक मार्गदर्शनासाठी मोबाईल व्हॅन

कायदेविषयक मार्गदर्शनासाठी मोबाईल व्हॅन

sakal_logo
By

swt१०२२.jpg
81847
सावंतवाडीः कायदेविषयक मार्गदर्शन करण्याऱ्या मोबाईल व्हॅनचा प्रारंभ करताना दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर आर बेडगकर व अन्य.


कायदेविषयक मार्गदर्शनासाठी मोबाईल व्हॅन
सावंतवाडीत प्रारंभः गावागावात करणार जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या कायदेशिषयक जनजागृती व्हॅनचा शुभारंभ दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. आर. बेडगकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. ए. उपाध्ये, विधीज्ञ पी. डी. देसाई, अध्यक्ष वकिल संघटना, सावंतवाडी व अन्य मान्यवर व कर्मचारी वृंद उपस्थित होते. गावागावातून लोकअदालतीचे आयोजन व्हावे, यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत १० ते १३ फेब्रुवारी या कालावधीत मोबाईल व्हॅनव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी दिवाणी न्यायाधीश सावंतवाडी श्रीमती बेडगकर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. येथील दिवाणी न्यायालयाच्या आवारातून ही व्हॅन अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, सावंतवाडी तथा दिवाणी न्यायाधीश सावंतवाडी, यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केली. यावेळी दिवाणी न्यायाधीश श्रीमती बेडगकर, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. ए. उपाध्ये, विधीज्ञ पी. डी. देसाई, अध्यक्ष वकिल संघटना, सावंतवाडी, विधीज्ञ पूजा जाधव, विधीज्ञ निलिमा गावडे, विधीज्ञ स्वप्नील कोलगांवकर, सहा अधिक्षक श्रीमती एन. एस. सावंत व एस. एस. सबनीस तालुका विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ लिपीक श्रीमती. व्ही. एम. मीर आदी न्यायालयीन कर्मचारी व पोलीस उपस्थित होते.