रत्नागिरी-ठणठणीत असल्याने पंढरीनाथ आंबेरकरला डिस्चार्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-ठणठणीत असल्याने पंढरीनाथ आंबेरकरला डिस्चार्ज
रत्नागिरी-ठणठणीत असल्याने पंढरीनाथ आंबेरकरला डिस्चार्ज

रत्नागिरी-ठणठणीत असल्याने पंढरीनाथ आंबेरकरला डिस्चार्ज

sakal_logo
By

शशिकांत वारीशे मृत्यू प्रकरण ............लोगो

ठणठणीत असल्याने आंबेरकर पुन्हा कोठडीत
जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज ; टु डी इकोचा रिपोर्ट नॉर्मल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता.१० : राजापूरातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झालेल्या संशयित पंढरीनाथ आंबेरकर याची प्रकृती ठणठणीत असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आल्याने त्याला जिल्हा रूग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्याची रवानगी पुन्हा कोठडीत करण्यात आली. शशिकांत वारीशे मृत्यू प्रकरणी आंबेरकर याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा टु डी इको नॉर्मल आला असून तो अगदी ठणठणीत आहे. त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयाने सोडल्याने आंबेरकरला आता पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे.
शशिकांत वारीशे मृत्यू प्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज सर्वत्र पत्रकारांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध करीत पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. वारीशे याचा अपघात दाखविण्यात आला होता. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. मात्र अपघाताबाबत संशय निर्माण झाला. पत्रकारांनी हा विषय उचलून धरल्यानंतर वस्तुस्थितीत पुढे आली. शेवटी कलम ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पंढरीनाथ आबेरकर याला अटक करून न्यायालयाने त्याला ७ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. मात्र आंबेरकर यांच्या प्रकृती बिघडली. त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आरोपींसाठी असलेल्या खोलीत पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आले.

पुन्हा कोठडीत
आंबेरकरचा टुडी इकोचा अहवाल शुक्रवारी आला असून तो नॉर्मल आहे. आंबेरकर यांची प्रकृती ठणठणीत असल्याने त्यांना आज दुपारी डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्च मिळाल्यामुळे आता आंबेरकर याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.