Thur, March 30, 2023

कुडाळ हाणामासी
कुडाळ हाणामासी
Published on : 10 February 2023, 4:38 am
मोटार लावण्यावरून
कुडाळमध्ये खडाजंगी
कुडाळ, ता. १० ः रस्त्यावर गाडी लावण्यावरून दोन युवकांमध्ये खडाजंगी झाली. त्यावेळी एका महिलेने शिव्यांचा वर्षाव केल्याने कुडाळच्या नागरिकानी या घटनेबाबत संताप व्यक्त केला. शहरात नक्षत्र टॉवर येथे एका पक्षाच्या युवकाने मोटार उभी केली होती. बाजूलाच रस्त्यावर कुडाळ शहरातील युवकांनी त्यांची मोटार थांबविली होती. त्या पक्षाच्या युवकांने दुचाकीसाठी असणाऱ्या जागेतून आपली मोटार रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोन्ही युवकांमध्ये खडाजंगी झाली. युवकांसमवेत असणाऱ्या महिलेने दुसऱ्या मोटारीवर लाथा मारण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पोलिसांनी संबंधित तिघांना पोलिस ठाण्यात नेले.