मुख्यमंत्री शिंदे उद्या जिल्ह्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री शिंदे उद्या जिल्ह्यात
मुख्यमंत्री शिंदे उद्या जिल्ह्यात

मुख्यमंत्री शिंदे उद्या जिल्ह्यात

sakal_logo
By

82001
सिंधुदुर्गनगरी : पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणी निदर्शने करताना जिल्ह्यातील पत्रकार.

मुख्यमंत्री शिंदे उद्या जिल्ह्यात

सिंधुदुर्गनगरीत पत्रकार भवनाचे होणार उद्‍घाटन; पत्रकार संघाकडून सोहळ्याचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ ः आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने सिंधुदुर्गनगरीमध्ये उभारलेल्या बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाचे उद्‍घाटन सोमवारी (ता. २०) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय लघू, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या सोहळ्याच्या नियोजनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि ज्येष्ठ पत्रकारांची संयुक्त बैठक काल (ता. १०) सिंधुदुर्गनगरी येथे झाली. या बैठकीमध्ये सोमवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले. या सोहळ्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार व लोकप्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाच्या उद्‍घाटनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पत्रकार संघ आणि ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजनच्या जुन्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर होते. यावेळी सचिव देवयानी वरसकर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी गणेश जेठे, ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, संतोष वायंगणकर, खजिनदार संतोष सावंत, सहकार्यवाह महेश रावराणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, अभिमन्यू लोंढे, अशोक करंबळेकर, विद्याधर केनवडेकर, महेश सरनाईक, रमेश जोगळे, अमोल टेमकर, संजय वालावलकर, हरिश्चंद्र पवार, महेश रावराणे, विकास गावकर, प्रभाकर धुरी, बाळ खडपकर, संतोष राऊळ, राजन नाईक, सुहास देसाई, विजय पालकर, चंद्रकांत सामंत, रवी गावडे, रामचंद्र कुडाळकर, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, मनोज वारंग, विनोद परब, संदीप गावडे, दत्तप्रसाद वालावलकर आदींसह तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
---
बैठकीत विविध विषय चर्चेत
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये नव्याने उभारलेल्या बाळशास्त्री जांभेकर भवनाच्या उर्वरित कामाबाबत चर्चा झाली. शिल्लक काम तातडीने पूर्ण करण्याबाबत एकमताने ठरविण्यात आले. या भवनासाठी जमीन खरेदी करून देणारे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासह या भवनाच्या निर्मिती कामासाठी हातभार लागलेल्या सर्व लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. भवनाच्या उद्‍घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. या विशेष बैठकीमध्ये राजापूर येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करून संबंधितांना शिक्षा करावी, अशी मागणी यावेळी झाली.