Sat, March 25, 2023

प्रमोद जठारांच्या प्रयत्नातून ४ कोटी
प्रमोद जठारांच्या प्रयत्नातून ४ कोटी
Published on : 12 February 2023, 10:31 am
प्रमोद जठारांच्या प्रयत्नातून ४ कोटी
कणकवली ः भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी सततच्या पाठपुराव्यातून राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या लेखाशिर्ष २५/१५ अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४ कोटी रूपये भरीव निधी मंजूर करून आणला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण ५५ लाख, रत्नागिरी ५१ लाख, संगमेश्वर ६२ लाख, लांजा ५० लाख, राजापूर ७२ लाखाचा निधी मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी व देवगडसाठी एकूण ९५ लाख रूपये निधी मंजूर आहे. श्री. जठार यांच्याकडे रत्नागिरी व सिंधुदुर्गातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील विकासकामांना लेखी निवेदनाद्वारे निधी मागणी केली होती. यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्रव्यवहार करून विकासकामे मंजूर करून घेतली.