भिरवंडेत उद्या शेतकरी सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिरवंडेत उद्या शेतकरी सभा
भिरवंडेत उद्या शेतकरी सभा

भिरवंडेत उद्या शेतकरी सभा

sakal_logo
By

भिरवंडेत उद्या शेतकरी सभा
कनेडी ः भिरवंडेतील शेतकऱ्यांसाठी शेती पूरक व अन्न प्रक्रिया विषयक उद्योग व्यवसाय सुरू करण्याविषयी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. यासाठी खास शेतकरी सभेचे आयोजन केले असून ही सभा मंगळवारी (ता.१४) दुपारी अडीचला भिरवंडे ग्रामपंचायतीत होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, कृषी विषयक योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टिक तृण धाण्यापासून बनविलेल्या पदार्थांचे प्रदर्शन आहे. यावेळी सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा होणार आहे. शेतीतज्ज्ञ डॉ. आनंद तेंडुलकर, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, कृषी पर्यवेक्षक राजन सावंत हे मार्गदर्शन करणार आहेत. स्वतःचा काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करावा यासाठी शेतकरी, युवक, युवती, महिलांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन कृषीसेविका अर्चना केंद्रे यांनी केले आहे.