जाखडीच्या कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाखडीच्या कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
जाखडीच्या कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

जाखडीच्या कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

sakal_logo
By

rat१२१५.txt

बातमी क्र..१५ (टुडे पान ३ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-Rat१२p१५.jpg ः
८२२४६
धुत्रोली ः लोककलेच्या जागरात रंगलेले जाखडी नृत्य.
-Rat९p१६jpg ः
८२२४७
राज्यस्तरीय स्पर्धेत नृत्य सादर करताना स्पर्धक व उपस्थित रसिक प्रेक्षक. (छाया- विधान पवार)
----
जाखडीच्या कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

संभुराजू तुरेवाले मंडळाचे आयोजन; शाहिरी, वादन, नृत्याविष्काराने रंगला जागर
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १३ ः लोककलेचा मुळ गाभा जपत ढोलकीची कडकडणारी थाप, शाहिरांचा घुमलेला आवाज, तालाच्या ठेक्यावर लक्षवेधी कला रिंगणात तालबद्ध नाचणारे नृत्य कलाकार असा कलात्मक सोहळा पाहून रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कोकणातील जाखडी लोककलेच्या कलाविष्काराने तालुक्यातील धुत्रोली हनुमानवाडी येथे लोककलेचा जागर १२ तास घुमला.
संभुराजू तुरेवाले सांस्कृतिक उन्नती मंडळ (रजि.) यांच्यावतीने राज्यस्तरीय भव्यदिव्य जाखडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेत मुळगाभा हरवणारी जाखडी ही लोककला जपवणूक व वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने आणि नवशाहीर, कलाकारांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम घेण्यात आला. या स्पर्धेत एकूण १२ कला पथके सहभागी झाले. यामध्ये शिवकृपा नृत्य कलापथक (सवाद, ता. पोलादपूर), भैरवनाथ नाचमंडळ (तुरेवाडी, ता. मंडणगड), काळभैरव नाचमंडळ (उसरघर, ता. माणगाव), भैरी जोगेश्वरी कलामंच (शेनाळे, ता. मंडणगड), भैरवनाथ नृत्य कलापथक (तुळशी गणेशवाडी, ता. मंडणगड), सहकारी कलापथक (भेलेवाडी, ता. गुहागर), अमर नृत्य कलापथक (करंजखोल, ता. महाड), जय हनुमान नृत्य कलापथक (मुर, ता. माणगाव), श्री काळभैरव नृत्य कलापथक (कालसुरी, ता. म्हसळा), मानाईदेवी नृत्य कलापथक (सव देऊळवाडी, ता. महाड), (कै.) तात्याजी शिंदे प्रतिष्ठान नाच मंडळ (सव उगवतीवाडी, ता. महाड), पेणजाई नृत्य कलापथक (पेण तळे, ता. माणगाव) या कलापथकांचा समावेश होता.
रात्रभर रंगलेल्या या स्पर्धेत आध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक विषयांवर कवने सादर करण्यात आली तसेच नेत्रदीपक नृत्यांचे आविष्कार मन मोहून टाकणारे ठरले. शाहीर गायकांनी आळवलेले सूर कानांना तृप्त करणारे ठरले. उत्तरोत्तर वाढत गेलेल्या रंगतीने स्पर्धेचा कलात्मक दर्जा विशिष्ट उंचीवर गेला. परीक्षकांनी नोंदवलेले निरीक्षण ही कला अधिक परिपूर्ण होण्यासाठी उपयुक्त ठरले. स्पर्धेत सहभागी कलापथकांना रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, सन्मानपत्र, मेडल, ढोलकी देऊन गुरूवर्य यांच्यासमवेत सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार योगेश कदम, संभुराजू तुरेवाले मंडळाचे अध्यक्ष रमेश घडवले, कलगीतुरा मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे, गुरूवर्य पांडुरंग नांदवीकर, दिनकर दळवी, शिवराम पोटले, सदानंद वाडकर, अशोक कोष्टी, सखाराम खोत, हिंदुराव पाटील, पांडुरंग पाटील, बाळासो चौगळे, रंगराव मालप, रामचंद्र म्हात्रे, वामन बैकर, संदीप राजपुरे, भाई पोस्टुरे, संतोष गोवळे, रमेश दळवी, पांडुरंग बाईत, अस्मिता केंद्रे, अनंत केंद्रे, प्रकाश शिगवण, रघुनाथ पोस्टुरे, हरिश्चंद्र लोखंडे, विजय ऐनेकर, इरफान बुरोंडकर, संतोष पार्टे, गजानन अधिकारी, विश्वनाथ सावंत, चंद्रकांत लाड, प्रभाकर बिरवाडकर, सतीश दिवेकर व कलाक्षेत्रातील प्रसिद्ध शाहीर कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.