वन्यप्राणी नुकसानीकडे शासनाचे वारंवार दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन्यप्राणी नुकसानीकडे
शासनाचे वारंवार दुर्लक्ष
वन्यप्राणी नुकसानीकडे शासनाचे वारंवार दुर्लक्ष

वन्यप्राणी नुकसानीकडे शासनाचे वारंवार दुर्लक्ष

sakal_logo
By

82270
दादा बेळणेकर

वन्यप्राणी नुकसानीकडे
शासनाचे वारंवार दुर्लक्ष

दादा बेळणेकर; योग्य भरपाई देण्याची मागणी


कुडाळ, ता. ८ ः जिल्ह्यात शेती, फळबागायत मोठया प्रमाणात केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षापासून वन्य प्राणी व पक्षांकडून मोठया प्रमाणात शेती, फळबागांचे नुकसान होत आहे. शासनदरबारी वेळोवेळी निवेदन देऊन, लक्ष वेधूनही या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. आम्हाला शासनाने महत्वाचे पीक व फळे याचे नुकसान झाल्यास आवश्यक ती भरपाई द्यावी, अशी मागणी माणगाव खोऱ्यातील प्रगतशील शेतकरी दादा बेळणेकर यांनी मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांच्याकडे केली आहे.
श्री. बेळणेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘‘शेतकरी, बागायतदार, फळ उत्पादक, व्यवसायिकांची मागणी आहे की, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत विचार व्हावा. वन्य प्राणी व पक्षांकडून होणाऱ्या फळ, भातशेती नुकसानीबाबत राज्यपातळीवर वन्यजीव प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच समिती गठीत केली आहे. जिल्ह्यातील शेती व बागायत ही वनांच्या जवळ असल्याने वन्यप्राणी शेतात घुसुन शेती बागायतीचे नुकसान होते. याचे पंचनामे वेळेवर करून शासकीय भरपाईची रक्कमेत योग्य ती वाढ देऊन मिळावी. वन्यप्राणी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची तरतुद आजच्या बाजार भावाप्रमाणे होऊन मिळावी. वन्यप्राण्यांपासून शेती, बागायतींचे संरक्षण होण्यासाठी शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण उभारण्यास शासनाने ९० टक्के अनुदान दयावे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त तसेच हत्ती बाधीत क्षेत्राची कार्यकक्षा वाढविणे, नुकसान भरपाईचे पंचनामे त्वरित करण्यात यावेत, कमीत कमी कागदपत्रे म्हणजे फक्त शेतकऱ्यांचा सात बारा घेण्यात यावा, वादग्रस्त ठिकाणी अनेक खातेदार असतील तेव्हा शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेऊन नुकसानीची रक्कम अदा करावी.’’